चिमुकल्यांनी दिला वीज बचतीचा संदेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नागपूर - वीज दैनंदिन आयुष्यातील गरज असून, सर्वच ठिकाणी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. वापराच्या तुलनेत वीजनिर्मिती कमी असल्याने भारनियमनासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विजेचा योग्य वापर करून जास्तीत जास्त विजेची बचत करावी, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नागपूर - वीज दैनंदिन आयुष्यातील गरज असून, सर्वच ठिकाणी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. वापराच्या तुलनेत वीजनिर्मिती कमी असल्याने भारनियमनासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विजेचा योग्य वापर करून जास्तीत जास्त विजेची बचत करावी, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरवर्षी पाण्याचा सर्वत्र दुष्काळ पडतो. त्याचप्रमाणे भविष्यात विजेचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी विजेचा काटकसरीने वापर करणे आवश्‍यक आहे, असा संदेश देतानाच विद्यार्थ्यांनी वीज बचत करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. सकाळ एनआयईतर्फे श्रीकृष्णनगर, उदयनगर चौक येथील संत सावता हायस्कूलमध्ये "वीज बचत : काळाची गरज' विषयावर बुधवारी वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मंचावर संस्थेचे सचिव चंद्रभान चिमोटे, सहसचिव जयप्रकाश चिमोटे, अध्यक्ष प्रमिला चिमोटे, हायस्कूल मुख्याध्यापक सरोज चिमोटे, प्राथमिक मुख्याध्यापक नलिनी बोबडे उपस्थित होते. स्पर्धेत विजेते ठरलेल्या संकेत फुसे, शुभम तिवारी व टिना पांजोळे या तीन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रतिभा वाके व छाया मैसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्रेया टाकळकर यांनी संचालन केले. स्वाती धाडसे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रशांत गणोरकर, संजय गाडगे, अर्चना अचवट, छाया मेश्राम, सविता चिमोटे, ज्योती मानमोडे, श्रीकांत चिमोटे, मीनाक्षी आंबेकर शिक्षक उपस्थित होते. 

"सकाळ एनआयईचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो. शिवाय सकाळच्या एज्युप्राईमचाही विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढण्याकरिता मदत होत आहे. सकाळने असेच उपक्रम भविष्यातही नियमितपणे घ्यावे, अशी माझी इच्छा आहे.' 
-जयप्रकाश चिमोटे (संस्थेचे सहसचिव) 

आज भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये 
गुरुवारी (ता. दोन) नंदनवन येथील भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये "मोबाईल, टीव्ही काळाची गरज की नाही' या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा दुपारी बाराला होईल. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ एनआयईतर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: Children gave the message of saving electricity