गारठा कायम, पारा 9 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नागपूर - उपराजधानीत मंगळवारी या मोसमातील नीचांक नोंदविल्यानंतर पारा बुधवारी किंचित चढला, मात्र गारठा थोडासाही कमी झाला नाही. विदर्भात गारठा नवर्षापर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे.

नागपूर - उपराजधानीत मंगळवारी या मोसमातील नीचांक नोंदविल्यानंतर पारा बुधवारी किंचित चढला, मात्र गारठा थोडासाही कमी झाला नाही. विदर्भात गारठा नवर्षापर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे.

उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे विदर्भात सध्या थंडीची लाट पसरली आहे. मंगळवारी नागपूरचे किमान तापमान प्रथमच नीचांकावर (7.7 अंश सेल्सिअस) आले होते. बुधवारी त्यात एका अंशाने वाढ होऊन तापमान नऊ अंशांवर स्थिरावले. गोंदियावासींनाही थोडाफार दिलासा मिळाला. मंगळवारी 7.5 अंशांवरील पारा आज नऊ अंशांवर गेला. मंगळवारच्या तुलनेत अकोला (9.5 अंश सेल्सिअस) आणि वर्धा (10.5 अंश सेल्सिअस) येथेही किमान तापमानात किंचित वाढ दिसून आली. हवामान विभागाने विदर्भात आणखी काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्‍यता वर्तविल्यामुळे नागरिकांना हुडहुडीपासून सध्यातरी सुटका मिळणे कठीण आहे.

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

10.12 AM

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

10.12 AM

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

10.12 AM