१५ लाख लुटणारे तीन फरार अट्टल गुन्हेगार गजाआड

१५ लाख लुटणारे तीन फरार अट्टल गुन्हेगार गजाआड

खामगाव : शेगाव येथील आनंद सागर पर्यटनस्थळाच्या समोर मुंबई येथील एका व्यक्तीला कमी किमतीत सोने देण्याचा बहाणा करून १५ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाला यश आले आहे. तीन्ही फरार आरोपींना वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

सचिन धनराज जाधव (२७) व गजानन पंडित चव्हाण (४५) दोघे रा. कारंजा, जि. वाशीम व मदन लक्ष्मण चव्हाण (७०) रा. रेल्वे सावंगी, दारव्हा, जि. यवतमाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन सोन्याच्या अंगठ्या, रोख ३ लाख ५९ हजार ४८३ रुपये आणि एक पांढऱ्या रंगाची झायलो गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

मुंबईच्या जोगेश्वरी वेस्टमधील रहिवासी लईक हसन महालदार (४९) हे शेगाव येथे आले होते. २२ मे २०१८ रोजी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास आनंद सागरसमोर एका वृद्धासह दोघे त्यांच्याजवळ आले. खोदकाम करताना सोने सापडल्याचे सांगून पाच लाख रुपये किलोप्रमाणे १५ लाखांत ते सोने देतो म्हणून त्यांना आमिष दाखविले. १५ लाख रुपये आणल्यानंतर आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी तपासचक्रे फिरविली. यासाठी पथक नेमण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार वाशीम, यवतमाळ, कारंजा, दारव्हा, रेल्वे सावंगी येथे आरोपींचा शोध घेण्यात आला. दरम्यान ८ जुलै रोजी सचिन जाधव, गजानन चव्हाण यांना कारंजातून अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर सचिन, गजानन व चव्हाण हेच गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे समजले. तसेच फरार आरोपी मदन चव्हाण याला सावंगी रेल्वे येथून अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना शेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींकडून १५ लाखांपैकी ३ लाख ५९ हजार ८४३ रुपये, सोन्याचे दोन अंगठ्या व झायलो वाहन जप्त करण्यात आले. 

या आरोपींची कसूल चौकशी केली असता त्यांनी शेगाव येथे फसवणूक केल्याचा दोन गुन्हे केल्याचे आणि दिग्रस पोलीस ठाण्यांतर्गत ८ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक शशी कुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, प्रदीप मोठे, देवेंद्र शेळके, रवींद्र कन्नर, गोपाल तारुळकर यांनी ही कारवाई केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com