स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू मृतांचा आकडा पोहोचला 20 वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

नागपूर - स्वाइन फ्लूच्या बाधेमुळे पुन्हा एका 34 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे स्वाइन फ्लूच्या मृत्यूमध्ये पुन्हा भर पडली असून, मृतांचा आकडा 20 वर पोहचला आहे. स्वाइनच्या बाधेने मृत्युसत्रात खंड पडत नसल्यामुळे आरोग्य विभागही हतबल झाला.

उकाड्यात स्वाइन फ्लूचा विषाणू तग धरून आहे. स्वाइन फ्लू बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून अल्पावधीत 85 वर आकडा पोचला आहे. खासगी व सरकारी रुग्णालयात सहा जण स्वाइन फ्लूच्या बाधेने अत्यावस्थ झाले आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. विशेष असे की 20 मृत्यूंपैकी 10 स्वाइन बाधितांचे मृत्यू शहरातील आहेत. मात्र, तरीदेखील महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे.