बाह्यरुग्ण विभागात ‘अधिष्ठाता’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मेडिकल - रुग्ण तपासणीला प्राधान्य, वसतिगृहातही दिली धडक 

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आपत्कालीन विभागासह बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड येथे डॉक्‍टर उपस्थित राहत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होते. यातून मारहाणीच्या घटनाही घडतात. परंतु दर सोमवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे खुद्द लहान मुलांच्या बाह्यरुग्ण विभागात बसून चिमुकल्यांची तपासणी करतात. अधिष्ठाता उपस्थित असल्याने या विभागाचे शंभर टक्के निवासी डॉक्‍टर मेडिकलच्या ओपीडीत उपस्थित होते.

सोमवारी सकाळी नऊ वाजता अधिष्ठाता कोणालाही माहीत नसताना अचानक मुख्य बाह्यरुग्ण विभागातून आले. जे अधिष्ठात्यांना ओळखतात, त्यांनी त्यांना बघताच कामे सुरळीत सुरू झाली. परंतु ‘आकस्मिक भेटी’च्या निमित्ताने आल्यानंतर डॉ. निसवाडे यांनी खुद्द विभागप्रमुखाचीही जबाबदारी निभावली. लहान मुलांना तपासले. यापुढे धुळ्यातील निवासी डॉक्‍टरांच्या मारहाण प्रकरणानंतर दररोज ‘आकस्मिक भेट पथका’च्या अभिनव योजनेतून सर्वसामान्य रुग्णांची गाऱ्हाणी ऐकून घेतात.

मेडिकलच्या निवासी डॉक्‍टरांच्या वसतिगृहात रात्री १० वाजता डॉ. निसवाडे धडकले. 

वसतिगृहात स्वयंपाकी तसेच सुरक्षारक्षकांशी चर्चा केली. यापूर्वी मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनीही मास कॅज्युअल्टी झाली असताना रुग्णांना तपासले होते. अधिष्ठाता असताना रुग्णसेवा देणारे अलीकडच्या काळातील दुसरे अधिष्ठाता आहेत.

मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यावर चांगले उपचार व्हावे, ही जबाबदारी प्रशासनाची असते. परंतु, बरेचदा निवासी डॉक्‍टरांचा निष्काळजीपणा किंवा इतरही कारणांमुळे रुग्णांची चांगली सेवा मिळू शकत नाही. रुग्णांच्या सेवेत कोणताही कसूर होऊ नये, यासाठी अधिष्ठाता निवसाडे प्रयत्नशील आहेत.

मोबाईलवरून उपचार - अधिष्ठाता 
मेडिकलच्या विविध वॉर्डातील रात्रकालीन रुग्णसेवा मोबाईलवरूनच दिली जाते. रात्रकालीन रुग्णसेवा देताना अनेक डॉक्‍टरांचे मोबाईल नंबर वॉर्डाच्या भिंतीवर लिहिले असतात. डॉक्‍टर मात्र वॉर्डातून गायब असतात. अचानक रुग्ण आल्यास परिचारिका मोबाईल क्रमांकावरून डॉक्‍टरला ‘कॉल’ करतात. गरज असल्यास डॉक्‍टर वॉर्डात हजेरी लावतात, अन्यथा मोबाईलवरूनच उपचार सांगून त्यावर तोडगा काढतात. असे एक नव्हे तर अनेक प्रकार पुढे आले आहेत. यावर लवकरच उपाय शोधण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ. निसवाडे म्हणाले.

विदर्भ

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

03.42 PM

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017