कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान रखडले..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

अकोला : उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदान रखडले असून सर्वत्र शेतकरी प्रतिक्षा करीत अाहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदीसाठी विविध फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले असून त्यावर व्याज अाकारणी सुरु झाली अाहे. काहींना कर्जाचा पहिला हप्ता भरण्याबाबत फायनान्स कंपन्यांकडून सूचना देण्यात अाल्या अाहेत. 

अकोला : उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदान रखडले असून सर्वत्र शेतकरी प्रतिक्षा करीत अाहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदीसाठी विविध फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले असून त्यावर व्याज अाकारणी सुरु झाली अाहे. काहींना कर्जाचा पहिला हप्ता भरण्याबाबत फायनान्स कंपन्यांकडून सूचना देण्यात अाल्या अाहेत. 

राज्यात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना रोटाव्हेटर, माळणीयंत्र, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, डाळमील, कपाशी श्रेंडर, कल्टीवेटर, पॉवर विडर, पाइल, पंप संच असे विविध प्रकारांसाठी अनुदान दिले जाते. सन २०१७-१८ च्या योजनेसाठी १५ मे २०१७ पर्यंत अर्ज मागवण्यात अाले होते.

जिल्ह्यात उद्दीष्टापेक्षाअधिक अर्ज अाले होते. त्यामुळे ड्रॉ काढून नावे निश्चित करण्यात अाली. निवड झालेल्यांना पत्र देण्यात अाले. खरेदीबाबत पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरेदी केली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोका तपासणी करून शहानिशा केली. बऱ्याच शेतकऱ्यांनी जानेवारीत ट्रॅक्टर खरेदी करून त्याचे देयक लगेच कृषीविभागात दिले. सहा ते साडे सहा लाखांचे ट्रॅक्टर फायनान्स कंपन्यांकडून पैसे घेत खरेदी केले. शासनाकडून दिले जाणारे अनुदान तातडीने मिळाले असते तर शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते फेडण्यास मदत झाली असती. मात्र अातापर्यंत हे अनुदान राज्य स्तरावरून वितरीत झालेले नाही. जिल्ह्यात अकोला उपविभागात २२१ तर अकोट उपविभागात ३८० ट्रॅक्टर देण्यात अाले. यासाठी सहा कोटी ८९ लाख रुपये अनुदान लागणार होते. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नसल्याने ते अार्थिक अडचणीत सापडले अाहेत. फायनान्स कंपन्यांकडून कर्जाचा पहिला हप्ता भरण्याच्या सूचना देण्यात अाल्या अाहेत. 

उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी ‘अारकेवाय’ मधून पैसा मिळतो. अायुक्तालयात ही प्रोसेस सुरु अाहे. 

मार्च नंतर इतर जिल्ह्यांचे जे अनुदान शिल्लक राहते त्याचा पुनर्वापर केला जातो. शिल्लक निधी जिल्ह्याच्या वाट्याला येईल. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते तयार करून ठेवण्यात अाले. पैसे अाल्याबरोबर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल.

- अजय कुळकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी, अकोला 

Web Title: donation of agriculture machinery paused