माजी आमदार डॉ. ढोले यांचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

चांदूररेल्वे (जि. अमरावती) - जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा चांदूररेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांच्या मोटारीला गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. ढोले मुंबईतील जनता दलाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आटोपून आज सकाळीच विदर्भ एक्‍स्प्रेसने चांदूररेल्वे येथे घरी परतले. त्यानंतर लगेचच स्वतःच्या मोटारीने कुऱ्हा येथील शेतात जाण्यास ते निघाले होते. मोटार चालवितानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. गाडीच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला होता. परिसरातील नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून डॉ. ढोले यांना बाहेर काढले. डॉ. ढोले यांचे पुत्र डॉ. क्रांतिसागर ढोले यांनी त्यांना त्वरित अमरावती येथील रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान डॉ. ढोले यांचा मृत्यू झाला.

Web Title: ex. mla dr. pandurang dhole death in accident