बॉम्बच्या अफवेने उडवली खळबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

मनसर - गडमंदिर परिसरातील वाहनतळाजवळ सकाळ दहाच्या सुमारास एक काळ्या रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळली. लागलीच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण परिसर ‘सिल’ केला. दोन्ही मार्ग दोर लावून बंद करण्यात आले. त्यामुळे गडावरील सर्व भाविक जागेवरच खोळंबले. बॉम्ब शोधक व नाशक पथक, आरसीपी व बीडीडीएसचे जवान, कमांडो व पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला. प्रशिक्षित श्‍वानाला पाचारण करण्यात आले. सर्वांच्याच चेहऱ्यावर भीती पसरली होती. दीड ते दोन तासांच्या कसरतीनंतर बॅगमध्ये काही कपडे, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या असे सामान असल्याचे कळले.

मनसर - गडमंदिर परिसरातील वाहनतळाजवळ सकाळ दहाच्या सुमारास एक काळ्या रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळली. लागलीच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण परिसर ‘सिल’ केला. दोन्ही मार्ग दोर लावून बंद करण्यात आले. त्यामुळे गडावरील सर्व भाविक जागेवरच खोळंबले. बॉम्ब शोधक व नाशक पथक, आरसीपी व बीडीडीएसचे जवान, कमांडो व पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला. प्रशिक्षित श्‍वानाला पाचारण करण्यात आले. सर्वांच्याच चेहऱ्यावर भीती पसरली होती. दीड ते दोन तासांच्या कसरतीनंतर बॅगमध्ये काही कपडे, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या असे सामान असल्याचे कळले. सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून पोलिसांच्या कामगिरी यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला.

 

रविवारचा दिवस. गडमंदिर परिसर सकाळपासूनच भाविक भक्तांनी बहरलेला. त्यात गडावरील सीतामाई रसोई येथे देवस्थानच्या रिसीव्हरला निरोप समारंभ व सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम. त्यामुळे गडावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. त्यातच गडावर बॉम्ब सापडल्याची वार्ता  सगळीकडे पसरली. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर बॅगमध्ये बॉम्ब नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी ‘मॉकड्रिल’असल्याचे जाहीर केल्यानंतर बघ्यांनी  सुटकेचा श्‍वास घेतला. या वेळी उपविभागीय अधिकारी राम जोशी, कदम, ठाणेदार मनीष ठाकरे, दंगा नियंत्रक पथकाचे धीरज महाजन, राजेश डोकेवार, बॉम्बशोधक व नाशक पथकाचे एपीआय एम. बी. रौतिया आदींनी मोहीम फत्ते केली.

Web Title: The excitement of the bomb rumor tormented

टॅग्स