जांभा येथील शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

जांभा बु. येथील एका 51 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर नातेवाईकाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्युची नोंद केली.

बोरगाव मंजू - बोरगाव मंजू पोलिस ठाणे हद्द येणार्‍या जांभा बु. येथील एका 51 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर नातेवाईकाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्युची नोंद केली.

प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजु पोलिस ठाण्यात नातेवाईकाने फिर्याद दिल्यावरून शेतकरी रमेश पुर्णाजी चिकटे वय  51 रा. जाभा बु. हे नेहमी प्रमाणेच रात्री झोपले होते. तर आज सोमवारी सकाळी त्यांनी राहत्या  घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर सदर प्रकरणी घटनास्थळवर ठाणेदार विजय मगर हे . का. कैलास गवई, लक्ष्मण आंबेकर सह पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपास करीता मुर्तीजापुर येथील रुग्णालयात पाठवून पोलिस दफ्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: a farmer Suicide in Jambha