पीककर्जासाठी प्रशासनातर्फे दर शुक्रवारी 'शेतकरी कर्ज सहायता दिन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

अकोला - शेतकऱ्यांना सुलभपणे पीककर्ज मिळण्यासाठी प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
या दिवशी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक बँकेच्या शाखेत स्वत: उपस्थित राहून पीककर्जासंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करतील. पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सदर मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी याबाबतच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. तसेच दर सोमवारी पीककर्ज वितरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पीककर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई नको
शेतकऱ्यांसाठी पुढील महिना अत्यंत महत्त्वाचा असून, खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदीकरीता बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्यावे, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू देऊ नये, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुलभपणे पीककर्ज मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावा. या कामात कुठल्याही प्रकारे दिरंगाई करू नये, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली आहे.

Web Title: The Farmers' Loan Assistance Day is organized every Friday by the administration