३१ काेटीतून साधणार शेतकरी, महिलांचे हित 

३१ काेटीतून साधणार शेतकरी, महिलांचे हित 

अकाेला - जिल्ह्यातील मागासवर्गीयांची लाेकसंख्या लक्षात घेवून मागील अनुषेशासह भरघाेस तरतूद शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून अंदाजपत्रक अर्थसमिती सभापती पुंडलीकराव अरबट यांनी गुरुवारी (ता.२३) जाहिर केला. शेतकऱ्यांना कृषीपयाेगी साधनांसह प्रशिक्षण, गराेदर महिलांना साेनाेग्राफीसाठी अनुदानासह महिला व युवतींना स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी साधने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. तर किमान यावर्षी तरी निधी खर्च करा, असा टाेला जिल्हा परिषदेच्या सभेत विराेधी सदस्यांनी लगावला. 

चालू वर्षासाठी ३१ काेटी ३६ लाख २६ हजार रूपये मुळ खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून १ काेटी ९१ लक्ष सात हजार शंभर रूपयाच्या शिलकीच्या अंदाजपत्रकास सभागृहाने मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी केलेल्या तरतुदीनुसार विचार करून व जिल्हा परिषदेच्या अपेक्षीत उत्पनाशी सांगड घालून विविध विभागांनी केलेल्या मागणीनुसार अर्थसमिती सभापती पुंडलीक अरबट यांनी अध्यक्ष संध्याताई वाघाेडे यांच्या प्रमुख उपस्थीतीत अर्थसंकल्प मांडला. यावेळी उपाध्यक्ष जमीर खान, महिला व बालकल्याण सभापती रेखा अंभाेरे, समाजकल्याण सभापती देवकाबाई पाताेंड, मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे (पाणी व स्वच्छता) यांचेसह विविध विभागाचे प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थीत हाेते. सभेची सुरवातच वादाने झाली. सदस्य ज्याेत्स्ना चाेरे व सदस्य अक्षय लहाने यांना माहिती देण्यास टाळाटाळ करून अपमान केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता गावंडे यांनी सभागृहाची माफी मागितली. यानंतर अर्थसभापती पुंडलीक अरबट यांनी ३१ काेटी ३६ लाख रुपयाचा बजेट सादर केला. गेल्या वर्षीचाच निधी खर्च केला नाही, लाभार्थ्यांना न्याय देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आराेप करीत सदस्य नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सदस्या ज्याेत्स्ना चाेरे यांनी समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाच्या याेजना का राबविल्या गेल्या नाही याचा जाब विचारला.किमान या वर्षीतरी याेग्य नियाेजन करून लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा अशी अाग्रही मागणी केली. विराेधी पक्षनेते रमण जैन यांनीसुध्दा उपमुख्य कार्यकारी अधिकारी साेनकुसरे यांना धारेवर धरले. एकंदरीत पैसा असूनही याेजना गांभिर्याने राबविल्या गेल्या नाहीत असा आराेप सदस्यांनी अधिकाऱ्यांविषयी नाक मुरडत केला. येणाऱ्या वर्षात तरी याेजना मार्गी लावाव्यात असा टाेला सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. 

निधीचे वितरण 
ग्रामिण पाणी पुरवठा - २० टक्के 
समाजकल्याण - २० टक्के 
महिला बालकल्याण - १० टक्के 
अपंग लाभार्थी - ३ टक्के 

असा हाेणार खर्च 
याेजना - खर्च - उपाययाेजना 
समाजकल्याण - ३ काेटी ८४ लाख ३१ हजार रूपये - सौर कंदील, पिकाे मशिन, शेळीपालन, ताडपत्री,एचडीई पाईप, शेतकरी बियाणे वाटप, झेरॉक्स, लॅपटॉप, ठिबकसिंचन,पिठाची गिरणी, दुधाळ जनावरे, अल्पभुधारक शेतकऱ्यांना बियाणे वाटप 
अपंग लाभार्थी - २८,२८,००० रूपये - लॅपटॉप, पिठाची गिरणी, तिन चाकी सायकल, झेरॉक्स मशिन, रुबेला लसीकरण, क्रिडास्पर्धा 
कृषी - २ काेटी ६४ लाख ८८ हजार रुपये - शेतीपयाेगी अवजारे, कार्यशाळा, सौर कंदील, शेती मित्र शेतकरी सत्कार, पेरणीयंत्र 
महिला बालकल्याण - २ काेटी ८४ लाख ३४ हजार रुपये - महिला, मुलींना सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षणे, स्वयंराेजगाराच्या साधनांचे वितरण 
आराेग्य - १ काेटी १५ लाख २४ हजार रुपये - दुर्धर आजारासाठी निधी 
बांधकाम - ४ काेटी ६४ लाख २ हजार रूपये - ग्रामिण अंतर्गत रस्ते 
शिक्षण - २ काेटी ४५ लाख ३३ हजार - सीसीटीव्ही, बायाेमेट्रीक,डिजीटल स्कूल, डेस्क-बेंच, बुट, खेळाचे साहित्य 
ग्रामिण पाणीपुरवठा - ११ काेटी सात लाख ५१ हजार रूपये - देखभाल व दुरुस्ती 
पशुसंवर्धन - ६० लाख २३ हजार - वैरण विकासासाठी बियाणे वाटप, बाेकड वाटप, कुक्कूटपक्षी वाटप 
लघु पाटबंधारे - २५ लाख ८६ हजार - बंधारे दुरुस्ती, जलतज्ञाचे मानधन 

तर केले जावू शकते बियाणे वाटप 
अल्पभुधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांना बियाणे वाटपासाठी स्वतंत्र निधी आरक्षीत करण्यात आला नाही पण समाजकल्याण विभाग व कृषी विभागाच्या बजेटमध्ये टाेकण ठेवण्या आले आहे. मागणी आल्यास बियाणे वाटपाची याेजना गेल्या वर्षीप्रमाणे राबविल्या जावू शकते. तुर्तास याबाबत एकाही सदस्याने सभागृहात या विषयाबाबत मुद्दा उपस्थीत केला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com