वित्त अधिकाऱ्याअभावी मनपा ‘पंक्‍चर’

Nagpur-Municipal
Nagpur-Municipal

नागपूर - महापालिकेचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण वित्त व लेखा विभाग सद्यस्थितीत बेवारस स्थितीत असल्याने अर्थविषयक महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. या विभागाचा अतिरिक्त  कार्यभार उपायुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे असून आर्थिकविषयक फाईल्स रखडल्या असून याचा फटका विकासकामांना बसत आहे. परिणामी नगरसेवकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

महापालिकेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे निवृत्त झाल्यानंतर वित्त व लेखा विभागाचा कणाच मोडला असून त्यांच्यानंतर आलेल्या मोना ठाकूर यांनी शिस्त व नियमाने या विभागाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विकासकामांच्या फाइल्स रोखल्या, कंत्राटदारांची देयके रोखली, परिणामी महापालिकेत त्यांच्याविरोधात रोष निर्माण झाल्याने त्यांचीही येथून बदली करण्यात आली. 

आता या विभागात वित्तविषयक जाणकार व जबाबदार अधिकाऱ्यांची उणीव भासत आहे. तूर्तास या विभागाचा प्रभार उपायुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे आहे. परंतु, इतर विभागाचीही त्यांच्यावर जबाबदारी असून बैठकी यातूनच त्यांना वेळ मिळत नसल्याचे समजते. एवढेच नव्हे आर्थिक विषयाशी संबंधित फाइल्स मंजूर करण्याची जोखीम पत्करण्यासही ते तयार नसल्याचे सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही अधोरेखित झाले. स्थायी समितीने वित्त व लेखा विभागाला प्रशासकीय अहवाल व लोखा विवरणपत्र बैठकीत ठेवण्याचे निर्देश दिले होते. परंतु, अहवाल व विवरणपत्रेही तयार करण्यातही कापडनीस अपयशी ठरले. अखेर पुढील बैठकीपर्यंत विषय गेला. त्यामुळे महापालिकेचा कणा असलेला हा विभाग अपंग झाला आहे. महापालिकेला अनुभवी वित्त अधिकाऱ्याची गरज कंत्राटदार असोसिएशनने व्यक्त केली.

वित्त अधिकारी असूनही जबाबदारी नाही 
महापालिकेत जबाबदार, अर्थतज्ज्ञ वित्त व लेखा अधिकाऱ्याची गरज आहे. यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासच्या वित्त व लेखा विभागाची जबाबदारी पार पाडणारे विलास कावळे यांची महापालिकेत मदन गाडगे निवृत्त होण्यापूर्वी बदली करण्यात आली. गाडगे यांच्या निवृत्तीनंतर कावळे वित्त व लेखा विभागाची जबाबदारी पाहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांच्याऐवजी प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदार देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com