दहेगाव जंगलाला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

आमगाव - गोंदिया-आमगाव राज्यमार्गावरील दहेगाव जंगलाला सोमवारी (ता. १५) सायंकाळी साडेतासच्या सुमारास आग लागली. या आगीत जंगल धगधगत होते. जंगलात हरणाचा वावर असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली. याचे कारण कळू शकले नाही. यात मात्र, लाखो रुपयांची हानी झाली आहे.

दहेगाव-मानेगावच्या मधोमध जंगल आहे. या जंगलात काळ्या हरणाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या हरणाची विदर्भातील सर्वाधिक संख्या याच जंगलात असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच काळ्या हरणांचे जंगल अशी ओळख आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर, परजिल्ह्यातील पर्यटक जंगलाला भेट देतात. वन्यप्राण्यांचा वावर सुरू असतानाच सोमवारी सायंकाळच्या सुमारास या जंगलाला आगीने विळखा घातला. पाहता-पाहता आग सर्वत्र पसरली. त्यामुळे वन्यजीव  विभागासह वनविभागात एकच खळबळ उडाली. हरणासह अन्य वन्यप्राणी सैरभैर झाले. सायंकाळची वेळ असल्याने आग आटोक्‍यात आणायला वनविभागाला त्रास झाला. मंगळवारी सकाळी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तोपर्यंत जंगलातील बहुतांश भाग आगीत भस्मसात झाला.

जंगलाला लागून शेती आहे. शेतातील पालापाचोळा शेतकऱ्यांनी जाळला. त्यामुळे आग पसरली. मात्र, ही आग जंगलाला लागली नाही.
- लेखराम भुते, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी