जळगाव जामोद वनपरिक्षेत्र कार्यालयाला भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

जळगाव जामोद बसस्थानकासमोरील वनपरिक्षेत्र कार्यालयाला आज पहाटे साडेपाच चे सुमारास अचानक आग लागली.  ही आग एवढी भिषण होती की संपुर्ण कार्यालयासह साहित्य व सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस.कांबळे यांनी येवून पाहणी केली तसेच जळगाव जामोद पोलिस स्टेशनला माहिती दिली.

जळगाव जामोद : येथील वनपरिक्षेत्र विभगाच्या कार्यालयास आज (शनिवार) रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. 

जळगाव जामोद बसस्थानकासमोरील वनपरिक्षेत्र कार्यालयाला आज पहाटे साडेपाच चे सुमारास अचानक आग लागली.  ही आग एवढी भिषण होती की संपुर्ण कार्यालयासह साहित्य व सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस.कांबळे यांनी येवून पाहणी केली तसेच जळगाव जामोद पोलिस स्टेशनला माहिती दिली. अग्निशामक दलास येण्यास वेळ लागल्याने अध्र्यापेक्ष जास्त कार्यालय जळून खाक झाले होते. कार्यालयाची इमारत जुनी व शिकस्त होती. त्यात सागवान लाकडाचा वापर होता. कार्यालयातील लाकडी फर्निचर, कपाट, टेबल, संगणक सुध्दा आगीत जळून खाक झाले आहे. 

सदर आग ही शॉर्टसर्विâटमुळे लागल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणत असले तरी या आगीबाबात संशय व्यक्त केल्या जात आहे. वनपरिक्षेत्राचे स्थापनेपासूनचा सर्व दस्ताऐवज इमारतीमध्ये होतो. तो पुर्णता नष्ट झाला  असून कोणताच रेकॉर्ड शिल्लक राहलेला नाही. आगीमध्ये संगणक, फर्निचर व इमारतीचे असे एकुण ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक दलाच्या अधिकाNयांनी आग विझवली मात्र तोपर्यंत संपुर्ण कार्यालय जळून खाक झाले होते. या वनपरिक्षेत्राचे आवारात वन विभागाने जप्त केलेली ७ ते ८ वाहने उभी होती. आग इतरत्र न पसरल्यामुळे मोठा अनर्थ टळला.  वनपरिक्षेत्रातील सातपुड्याचे कुशीत आग, वनवे लागून दरवेळी शेकडो हेक्टर वनसंपत्ती नष्ट  होते. परंतु आता वनपरिक्षेत्र कार्यालयच जळून खाक झाले. 

Web Title: fire in government office

टॅग्स