संपर्काबाहेरील 'या' 78 गावांचे साखळी उपोषण

मनोहर बोरकर
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नऊ मागण्या पुढे करून साखळी उपोषण सुरु केले आहे.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसूर जारावंडी मुख्य रस्त्यावरुन वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुल क्षतिग्रस्त झाल्याने परिवहन महामंडळची बस सेवा व इतर वाहतूक बंद झाल्याने गेली दोन महिन्यांपासून त्या भागातील 78 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सदर समस्या व इतर समस्यांची मागणी करत जारावंडी कसनसूर गटाचे जिल्हा परिषद् सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शालिकराम गेडाम व नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण (ता. 25) सोमवारपासून सुरू केले करावे लागले.

सदर दोन्ही पूल क्षतिग्रस्त घोषित करने अगोदर प्रशासनाने वाहतुकीस पर्यायी मार्गाची सोय न करता दोन्ही ठिकाणी केवळ फलक लावून वाहतुकीस प्रतिबंध केला आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना विविध जीवनावश्यक वास्तु खरेदी तसेच शासकीय कार्यालयीन कामे करण्यास, विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास व रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यास त्रास सहन करावा लगत आहे. प्रसंगी उपचाराशिवाय जिव गमावण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. तसेच तालुका प्रशासनाला विविध प्रकारच्या शासकीय योजना व नागरी सेवा पुरविण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

झुरी व कांदळी या दोन्ही नाल्यावरील क्षेतिग्रस्त पुलांमुळे तालुक्यातील हालेवारा, कसनसुर, जारावंडी, कमके, कोठी, वाघेझरी, चोखेवाडा, पुन्नुर, सेवारी, झुरी, कोंदावाही, आसावंडी, गडदापल्ली, घोटसुर, मानेवारा, गुडराम, कारका, जवेली, भापडा, दोलन्दा, सिरपुर, सोहगाव, दिंडवी, वडसा कला, इत्यादी 78 गावांच्या नागरिकांना दळनवळनाची पर्यायी व्यवस्था त्वरित करावी तसेच तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावा, अरोग्याच्या सोयी सक्षम कराव्यात इत्यादी नऊ मागण्या पुढे करून साखळी उपोषण सुरु केले आहे. मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शालिक गेडाम, तसेच त्याभागातील सरपंच व नागरिकांनी दिला आहे.