कल्लेडच्या जंगलात आढळला आणखी एका माओवाद्याचा मृतदेह

file photo
file photo

गडचिरोली: सिरोंचा तालुक्‍यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-60 पथकाच्या जवानांनी सात नक्षल्यांचा खात्मा केला होता. पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान आज (मंगळवार) त्याठिकाणी पुन्हा एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. यामुळे कल्लेड जंगलातील चकमकीत मृत नक्षल्यांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.

6 डिसेंबरच्या सकाळी कल्लेड जंगलात पोलिसांच्या सी-60 पथकासोबत माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 महिला व 2 पुरुष माओवादी ठार झाले होते. या घटनेनंतरही पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविणे सुरूच ठेवले होते. दरम्यान, आज सकाळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. यावरून कल्लेडच्या चकमकीत आणखी काही नक्षलवादी ठार किंवा गंभीर जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्याचे काम शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांकडून सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com