माओवाद्यांनी केली आदिवासी व्यक्तीची हत्या

माओवाद्यांनी केली आदिवासी व्यक्तीची हत्या

गडचिरोली - पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी बुधवारी (ता. २२) रात्री धानोरा तालुक्‍यातील तोडे येथील येथील आदिवासी व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. सुरेश तोफा (४३) असे मृताचे नाव आहे.

 बुधवारी रात्री सात सशस्त्र नक्षलवादी सुरेश तोफा यांच्या घरी गेले. त्यांनी सुरेशला झोपेतून उठवून बाहेर नेले आणि कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. नक्षल्यांनी घटनास्थळी एक बॅनर बांधले असून, सुरेश हा पोलिसांचा खबऱ्या होता, असे म्हटले आहे. धानोरा तालुक्‍यात मागील दोन दिवसांत नक्षल्यांनी तीन जणांची हत्या केल्याने संपूर्ण तालुक्‍यात प्रचंड दहशत पसरली आहे. 

२१ नोव्हेंबरच्या दुपारी पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत झाडापापडा येथे कोंबडबाजारात सुनील तिलकबापू पवार या युवकाची गोळ्या घालून हत्या केली.

याच रात्री रानवाही येथील जाधव जांगी याचाही माओवाद्यांनी खून केला. गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com