आमदार आत्राम यांचा तालुका दौरा वादग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

एटापल्लीः गडचिरोली जिल्हा पालकमंत्री आमदार अम्ब्रीशराव आत्राम यांचा गुरुवारचा (ता. 5) एटापल्ली दौरा कार्यकर्त्यांच्या दुफळीत भानगडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या नगरपंचायतीमध्ये मंत्री महोदयांचा स्वागत व सत्कार समारंभ घेण्यात आला त्यामुळे राजमहालाला गेली तडा संस्थानिकांनी सन्मान केला अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

एटापल्लीः गडचिरोली जिल्हा पालकमंत्री आमदार अम्ब्रीशराव आत्राम यांचा गुरुवारचा (ता. 5) एटापल्ली दौरा कार्यकर्त्यांच्या दुफळीत भानगडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या नगरपंचायतीमध्ये मंत्री महोदयांचा स्वागत व सत्कार समारंभ घेण्यात आला त्यामुळे राजमहालाला गेली तडा संस्थानिकांनी सन्मान केला अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

आदिवासी विकास व वन राज्य तथा जिल्हा पालक मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे मंत्री झाल्या नंतर एटापल्ली तालुक्यात कोणतीही निवडणूक असल्या शिवाय दौ-यावर आलेले नाहीत. गेल्या तीन वर्षांत वार्षिक तालुका आमसभाही घेतली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये मंत्री महोदय व भाजप सरकार विषयी नाराजी दिसून येते. अशातच तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्याने आत्राम यांचा तालुका दौ-या वेळी राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ, भाजप व पूर्वश्रमीचे नागविदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्त्यांनी बंड पुकारत आत्राम यांचे उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रमवर बहिष्कार टाकला.

वनोपज नाक्यावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गंपावार, आदिवासी आघाडी प्रमुख दीपक फुलसंगे, माजी पंचायत समिती सदस्य रैनेंद्र येमला यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी बायबाय राजे असा इशारा करुण मुख विरोध दर्शविला. कार्यक्रम वेळी मोजक्याच् कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंत्री महोदयांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली, अशा दुफळीमुळे या अगोदर झालेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला यश संपादन करता आले नाही. कार्यकर्त्यांचा फोन न उचलणे, भेटायला भेट न होने अशा तक्रारी वरिष्ठांकडे करूनही काही उपयोग होत नसल्याने आत्राम यांचा तालुका दौरा व संपूर्ण कार्यक्रमांवर बहिष्कार टाकून नाराजी व्यक्त बंड करणाऱया भाजप कार्यकर्त्यांनी 'सकाळ'ला सांगितले. येणा-या काळात आमदार आत्राम व भाजप अशा नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बंडाचे आव्हान कसे पेलतात याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

आमदारांकडून साधी विचरापूसही नाही...
पोलिसांच्या मारहाणीत गंभीर जखमी महिला मानो पुंगाटीची आमदार आत्राम यांचे कडून साधी विचारपूस सुद्धा नाही, मानो ही ग्रामीण रुग्णालय उपचार घेत आहे. रुग्णालयाची पाहणी करण्यास गेलेल्या मंत्री महोदयांनी सर्व रुग्णांची विचारपुस केली. मात्र, मानो पुंगाटी या महिलेची तब्बेत कशी आहे याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे मानोच्या नातेवाहिकांनी लोक वर्गणी करुण पुढील उपचार व आपले दुखद गा-हाण्याची कैफियत सांगण्यास गडचिरोली गाठून जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी पोलिस अधीक्षक यांनी पुढील उपचाराची व्यवस्था करुण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मानोचे पति रैनू पुंगाटी यांना दिले आहे.