कर्मचाऱ्यांना जीवनाश्यक वस्तुंसाठी ‘सेवा केंद्र’ 

याेगेश फरपट - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

अकाेला - पैशासाठी एटीएम किंवा बॅंकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे प्रभावीत झालेल्या कामकाजावर ताेडगा म्हणुन दैनंदीन उपयाेगाच्या वस्तूंसाठी प्रत्येक शासकीय व खासगी कार्यालयाच्या ठिकाणी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे, याची घाेषणा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता.१५) सायंकाळी केली. या उपक्रमाचे स्वागत कर्मचारी संघटनेने केले असुन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे अाभार मानले. 

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ८ नाेव्हेंबरला एेतिहासिक व क्रांतीकारी निर्णय घेवून १००० व ५०० रूपयाच्या नाेटा चलनातून बंद केल्या. हा निर्णय बदलतांनाच त्यांनी चलनी नाेटा बदलून घेणे व इतर आपतकालीन परिस्थीती हाताळण्यासाठी उपाययाेजना सुध्दा केल्या आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतू यामुळे असुविधा नाहीतर सुविधाच झालेली आहे. काेणत्याही चांगल्या गाेष्टीची अंमलबजावणी करतांना काही अडचणी येतातच. त्याचाच एक भाग म्हणुन जनतेला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळात बॅंकेत किंवा एटीएमवर रांग लावण्यात येत असल्याने त्याचा शासकीय कामकाजावर परिणाम हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकाराची दखल घेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आगामी १५ दिवसासाठी सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दैनंदीन वस्तू, सामान, आैषधीची गरज आहे. त्यांनी मागणीपत्र संबधीताकडे द्यावे. मागणीनुसार त्यांना वेळेत वस्तु पुरविल्या जातील. शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेकडून दैनंदीन उपयाेगात येणाऱ्या वस्तूची विक्री ही ‘ना नफा ना ताेटा’ या तत्वावर पुरविण्यात येतील. त्या माेबदल्यात खरेदी केलेल्या वस्तूची किंमत वेतनातून कपात करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

लग्नासाठी विशेष सुविधा

ज्या शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याच्या घरी लग्न आहे. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लग्नासाठी त्यांनी केलेल्या मागणीनुसार आवश्यक वस्तु पुरविल्या जातील. या कामासाठी संबधीत विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या वर्ग तीनचा एक व वर्ग चारचे दाेन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.