फाशीची शिक्षा झालेला कैदी गांधीविचार परीक्षेत पहिला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नागपूर - एका मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या व न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका कैद्याने गांधीविचार परीक्षेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. एवढेच नव्हे, तर दुसरा क्रमांकही फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याने पटकाविला आहे.

नागपूर - एका मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या व न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका कैद्याने गांधीविचार परीक्षेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. एवढेच नव्हे, तर दुसरा क्रमांकही फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याने पटकाविला आहे.

नागपुरातील सहयोग ट्रस्ट व मुंबई सर्वोदय मंडळातर्फे आयोजित या परीक्षेत मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी ही परीक्षा दिली. अनेक गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींचा यात समावेश आहे. गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्‍टोबरला गेल्या दहा वर्षांपासून ही गांधीविचार परीक्षा घेण्यात येते. महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रसार व प्रचार व्हावा व कैद्यांच्या विचारामध्ये सकारात्मक बदल व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविला जातो. महात्मा गांधी यांच्या "सत्याचे प्रयोग'सह काही पुस्तके बंदिवानांना मोफत दिली जातात. या पुस्तकांच्या आधारावर ही परीक्षा घेण्यात येते. या वर्षी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातील 203 कैद्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कैद्यांना खादीचे कपडे व गांधीविचारांची पुस्तके दिली जातात.

यात आयुष पुगलिया हा फाशीची शिक्षा झालेला नागपुरातील आरोपी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आयुष पुगलिया याने काही वर्षांपासून कुश कटारिया या 9 वर्षाच्या बालकाचे अपहरण करून खून केला होता. याशिवाय फाशीची शिक्षा झालेल्या नारायण चौधरी याने या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय राकेश कांबळे हा कुख्यात गुंडाने तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM