आरोग्यमंत्री डॉ. सावंत संतापले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नागपूर - राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत पावसाळी अधिवेशन सुरू असताना अचानकपणे "अदृश्‍य' झाले होते. विधान परिषदेवर त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाल्याचे समजते. मात्र बुधवारी 11 जुलै रोजी अचानक डॉ. सावंत हजर झाले. रविभवनातील कॉटेज क्रमांक 16 मध्ये पोहोचले. कॉटेजमधील अस्वच्छता बघून अक्षरशः संतापले. प्रत्येक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने डॉ. दीपक सावंत यांना डावलून विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली होती. मुंबई पदवीधर मतदारसंघातून गेल्या 18 वर्षांपासून डॉ. सावंत निवडून येत होते. यावर्षी मात्र शिवसेनेने त्यांच्याऐवजी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या खात्यातील प्रश्‍नांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यामुळे डॉ. सावंत आता येणार नाही. यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले होते. वरपासून तर खालपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी डॉ. सावंत बंगल्याकडे अधिकारी फिरकत नव्हते. यामुळे येथील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाले. विशेष असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपविला असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मात्र अद्याप स्वीकारला नाही. एवढेच नव्हे तर आपण मंत्रिमंडळाच्या बैठकींना हजर राहा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात डॉ. सावंत सभागृहात दिसले. दुसऱ्या आठवड्यात तीन दिवस उलटूनही ते दिसले नाही. अधिवेशनात आलेल्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री बोलत असल्याने ते नेमके कुठे गेले? हीच चर्चा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये होती. आरोग्य उपसंचालक कार्यालयातही त्यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा येथे रंगली होती. 

Web Title: Health Minister Dr. Sawant Angry