शस्त्रक्रियेशिवाय हृदयाची धडधड निरंतर - डॉ. पाटील

शस्त्रक्रियेशिवाय हृदयाची धडधड निरंतर - डॉ. पाटील

नागपूर - हृदयरोग हा शब्द उच्चारला किंवा ऐकला की, अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकतो. कारण, पूर्वी छाती फाडून हृदयावर शस्त्रक्रिया करणे अर्थात ‘बायपास’ हा एकच पर्याय होता. परंतु, हृदयरोगावर संशोधनातून उपचारांची भर पडली. एन्जिओग्राफीतून निदानानंतर बलून एन्जिओप्लास्टीपासून, तर ॲब्सार्व्हेबल स्टेंट एन्जिओप्लास्टीद्वारे टाकण्यापर्यंतची मजल मारली. याशिवाय शस्त्रक्रियेशिवाय हृदयाची धडधड निरंतर सुरू ठेवण्यासाठीच्या उपचाराचा दावा करीत आतापर्यंत सुमारे एक हजार ‘हृदय’ जिंकून घेतल्याचा दावा डॉ. प्रदीप पाटील यांनी केला.

दै. ‘सकाळ’तर्फे मंगळवारी आयोजित कॉफी विथ सकाळमध्ये डॉ. पाटील बोलत होते. हृदय कार्य मंदावते तेव्हा ब्लॉकेज झाल्याचे निदान ॲन्जिओग्राफीतून सहज लक्षात येते. अशावेळी ७० टक्केपासून, तर ९९ टक्के ब्लॉकेज असलेले हृदयविकाराचे रुग्ण विनाशल्यक्रियेच्या उपचारातून बरे झाले आहेत. टीएच-३ या यंत्राद्वारे ३५ दिवसांची ही उपचारपद्धती आहे. सिंक्रोनायझेशन करून विशिष्ट दाब दिल्याने रक्ताचा नैसर्गिकरित्या हृदयासह शरीराला पुरवठा करण्याची क्षमता तयार होते. याशिवाय अमेरिकन उपचारपद्धती असलेले ‘एसीटी’ तंत्रज्ञानही हृदयविकारावरील उपचारासाठी प्रभावी ठरत आहे. रक्तधमन्यात सलाईनद्वारे आठवड्यातून दोन वेळा विशिष्ट औषधांच्या मिश्रणातून ब्लॉकेजेस काढता येतात. २००४ पासून या तंत्रज्ञानातून तब्बल एक हजार हृदयविकाराच्या रुग्णांना बरे केल्याचा दावाही डॉ. पाटील यानी केला. 

पाश्‍चिमात्य जीवनशैलीचा आम्ही स्वीकार केला. जेवणातून डाळ-भाजी भाकरी दूर झाली. त्याऐवजी पिझ्झा बर्गर आला. मैदानी खेळ हरवले व व्यायाम दुरावला. स्पर्धेच्या युगात जिंकण्याची शर्यत लागली आणि ताणतणाव वाढले. यातून धूम्रपान, मद्यपान आणि मांसाहार वाढला. रक्तदाब वाढल्याने हृदयविकारही वाढले. हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी भारतीय आहारविहार पद्धती स्वीकारण्याची गरज आहे.

- डॉ. प्रवीण पाटील,  हृदयरोगतज्ज्ञ, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com