दुर्दम्य आत्मविश्‍वासाने अंधत्वावर मात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - दुर्दम्य आत्मविश्‍वास मनात जोपासून आपल्या अंधत्वावर मात करीत हृषिकेश या शेतमजुराच्या मुलाने डोळस यश मिळवित अनेकांचे डोळे दिपवले आहे. आंबेडकर महाविद्यालयातील हा विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांमधून ८५.३८ टक्‍के गुणासह प्रथम आला आहे. त्याच्या सुवर्ण यशाने संकटाचे रूपांतरही संधीत करण्याची किमया साधता येणे शक्‍य असल्याची प्रेरणा मिळते. 

माणसाच्या आयुष्यात संकट केव्हा येईल काही सांगता येत नाही. एखादे संकट तर माणसाला इतके खचवून टाकते, की माणुस पुढे आयुष्यभर उभा राहू शकत नाही. नैराश्‍य, वैफल्य, अविश्वास अशा सगळ्याच नकारात्मक भावनांच्या जाळ्यात त्याचं डोकं आयुष्यभर गरगरत राहतं. इतर विचारच सुचत नाहीत. मात्र, जन्मांध असलेल्या ऋषीकेशने त्यांच्यातील उणिवेचा कधीही बाऊ केला नाही वा त्या आधारावर इतरांची सहानुभूती मिळविली नाही.

सर्वसामान्यांप्रमाणेच त्यानेही अगदी बालपणापासून आपल्या आयुष्याबद्दल स्वप्ने रंगविली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सातत्याने प्रयत्नही केले. बुलडाणा जिल्ह्यातील उबाळखेड येथील रहिवासी असलेला हृषिकेश गेल्या काही वर्षांपासून शिक्षणानिमित्त नागपुरात आहे. सध्या तो संत चोखामेळा वसतिगृहात राहतो. वडील अनिल शेतमजूर असून आई गृहिणी आहेत. घरची परिस्थिती बेताचीच पण कर्तृत्वाच्या बळावर आपण प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करू शकतो असा आत्मविश्वास हृषिकेशला आहे. परीक्षेदरम्यान त्याने लेखनिकाची मदत घेतली होती. हृषिकेशला बुद्धिबळाची आवड आहे.  भविष्यात त्याला आयएएस होऊन समाजाचे ऋण फेडायचे आहे.

Web Title: HSC result declare blind rushikesh adhav success