अवैध बांधकामाला महापालिकेचे अभय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नागपूर - पारदर्शक कारभाराचे दाखले देणाऱ्या नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासन अतिक्रमणधारकास अभय देत असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांनी केला. 

मध्य नागपुरातील नटराज टॉकीज परिसरात बनोदे कॉम्प्लेक्‍स नावाची इमारत आहे. या इमारतीचे तीन मजले अवैध असल्याची तक्रार काही व्यापारी व नागरिकांनी 2015 मध्ये महापालिका आयुक्त व शहर पोलिस आयुक्तांकडे केली. त्यानंतर महापालिका 

आयुक्तांनी डिसेंबर 2016 ला अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले; परंतु अद्याप अवैध बांधकाम पाडलेले नाही. त्यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बांधकामात असलेली सदनिका एका व्यक्‍तीची असून, तो सत्ताधारी पक्षाच्या जवळचा आहे. तोच महापालिकेच्या नेत्यांना धमकावत असल्याचा आरोप शेळके यांनी केला. शहरातील बहुतेक इमारतींचे बांधकाम अवैध आहे. त्यांच्यावर 

कारवाई करण्याकडे महापालिका डोळेझाक करते. महापालिकेने हे अवैध बांधकाम त्वरित न हटविल्यास याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बंटी शेळके, प्रशांत तन्नेवार, राकेश निकोसे, नीलेश देशभ्रतार, आलोक कोंडापुरवार, रिजवान खानरुमवी, विक्रांत रत्नपारखी, गिरीश मालवी, हेमंत कातुरे, अभिजित ठाकरे यांनी दिला. 

Web Title: Illegal construction issue