इटरनिटी मॉलमधील दुकानाला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सीताबर्डी - सीताबर्डी येथील इटरनिटी मॉलमधील फॅशन बिग बाजार या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला आग लागली. यात दुकानातील संगणक, एलईडी टीव्ही आदी साहित्याची राखरांगोळी झाली. आगी पसरण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे सात बंब वेळीच पोहोचल्याने दुकानातील महागडे कपडे बचावले. इटरनिटी मॉलमध्ये सिनेमागृहा असून दिवसा प्रचंड वर्दळ असते. पहाटे आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. 

सिताबर्डी येथे इटरनिटी मॉलमधील पहिल्या माळ्यावर असलेले फॅशन बिग बाजारमध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास आग लागली. दुकानात आलार्म सिस्टिम असल्याने आग लागताच येथील सुरक्षा रक्षक सावध झाले. त्यांनी अग्निशमन विभागाला कळविले. सकाळी फिरण्यास निघणाऱ्यांना फॅशन बिग बाजारमधील आगीचा धूर दिसल्याने येथे गर्दी झाली. माहिती मिळताच फॅशन बिग बाजारच्या व्यवस्थापिका निकिता अग्रवाल, हितेश नारकर आदीही पोहोचले. अग्निशमन विभागाच्या बंबांनी दुकानावर पाण्याचा मारा केला.

पहाटेला आलार्म वाजल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन विभागाला कळविले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून नुकसानीबाबत उद्या स्पष्ट होईल. 
- हितेश नारकर, व्यवस्थापक, एफबीबी

आगीत नुकसान - 7 लाख (प्राथमिक अंदाज) 
बचत - 20 लाख (अग्निशमन विभागाचा दावा) 

Web Title: internity mall fire