"जेईई मेन'मध्ये प्राज्ञ रस्तोगी शहरात प्रथम 

"जेईई मेन'मध्ये प्राज्ञ रस्तोगी शहरात प्रथम 

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई)- मेन्सच्या गुरुवारी (ता.27) जाहीर झालेल्या निकालात शहरातून रेजोनन्सचा प्राज्ञ रस्तोगी याने 44 ऑल इंडिया रॅंक मिळवित शहरातून प्रथम स्थान पटकाविले. त्याच्यापाठोपाठ आयकॅड आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील समीर पांडे याने 68 वी रॅंक मिळवित दुसरे, तर 124 रॅंकसह दुर्गेश अग्रवालने तिसरे स्थान पटकाविले. अनुसूचित जातीतून आयआयटी होमच्या अखिलेश गणेशकरने सहावा, तर इतर मागासवर्गीयातून हिमांशू भोयरने 15 वा क्रमांक मिळविला. 

आयआयटी, एनआयटी आणि देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी दोन एप्रिलला लेखी, तर आठ आणि नऊ एप्रिलला ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. नागपूर विभागातून तीस हजारावर विद्यार्थ्यांनी जेईई मेनची परीक्षा दिली. यावर्षी गणित आणि फिजिक्‍सचा पेपर बराच लेंदी असल्याने विद्यार्थ्यांना तो सोडविण्यात बरेच परिश्रम घ्यावे लागले. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात दुर्गेश अग्रवालने 315 गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. आयकॅडचा हर्ष डोल्हारे याने 312 गुणांसह 164 वे स्थान, आयआयट होमच्या नीलजा भेंडेने अनुसूचित जमातीतून 129 स्थान, तर पूजा माटे हिने मुलीतून 3 हजार 801 वे स्थान मिळविले. 

शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील यशोदीप चिकटे याने 218 गुण, शर्वरी हेडाऊने अनुसूचित जमातीतून 37 वे स्थान मिळविले. 21 मे रोजी जेईई ऍडव्हान्सची परीक्षा होणार आहे. त्याचा निकाल 11 जून रोजी घोषित होणार आहे. आयआयटी होमचे 458, तर आयकॅडचे तीनशे विद्यार्थी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरले. शहरातून हजाराहून अधिक विद्यार्थी "जेईई ऍडव्हान्स'साठी पात्र ठरलेत. 

"जेईई मेन'च्या अंकावरच रॅंकींग 
सीबीएसईने परीक्षा पद्धतीमध्ये बराच फेरबदल केला आहे. यावर्षी जेईई मेनच्या गुणांच्या आधारावरच रॅंकिंग तयार करण्यात आली आहे. आता समोर विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि सीएफटीआयच्या प्रवेशासाठी "जेईई ऍडव्हान्स' परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेच्या गुणांकनात बारावीच्या परीक्षेतील गुणांचा समावेश केला जाणार आहे. यावर्षी सीबीएसईने जेईई ऍडव्हान्ससाठी 20 हजार जागा वाढविल्या. त्यानुसार एकूण 2 लाख 20 हजार जागांचा समावेश "जेईई ऍडव्हान्स'मध्ये होईल. 

आयआयटी मुंबईत प्रवेशाचे स्वप्न : प्राज्ञ रस्तोगी 
देशभरातून 44 वा रॅंक मिळविणाऱ्या प्राज्ञ रस्तोगीला आयआयटी मुंबईत कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळवायचा आहे. त्यासाठी "जेईई ऍडव्हान्स'ची तयारी जोरात करीत असल्याचे तो म्हणाला. त्याला 360 पैकी 327 गुण असून. फिजिक्‍समध्ये सर्वाधिक 112 गुण आहेत. गणितात 106 तर केमेस्ट्रीमध्ये 110 गुण मिळाले. फिजिक्‍सपेक्षा गणित लेंदी आल्यानेच गुण कमी पडल्याचे त्याने सांगितले. आयआयटी झाल्यावर करिअरची पुढची दिशा ठरवेल असेही तो म्हणाला. 

प्रशासकीय सेवेकडे कल - समीर पांडे 
देशभरातून 68 वी रॅंक मिळविणाऱ्या समीर पांडे याला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे. आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करणार असून, कॉम्प्युटर सायन्स शाखेकडे कल देणार असल्याचे तो म्हणाला. जेईई मेनमध्ये त्याने 360 पैकी 322 गुण मिळविले. यात गणितामध्ये 102, फिजिक्‍स 115 तर केमेस्ट्रीमध्ये 105 गुण आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com