यवतमाळात आढळला दुर्मिळ कंठेरी चिखल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

यवतमाळ - बोरगाव धरणावर आढळलेला दुर्मिळ कंठेरी चिखल्या.
यवतमाळ - मोठा कंठेरी चिखल्या (कॉमन रिंग प्लोवर) या पक्ष्याची यवतमाळजवळील बोरगाव धरणावर विदर्भातील दुसरी नोंद झाली आहे. प्राणिशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निरीक्षणादरम्यान या दुर्मिळ पक्ष्याची नोंद घेतली.

युरोप, आफ्रिका, पश्‍चिम व उत्तर आशिया व उत्तर अमेरिकेतून भारतीय उपखंडात येणारा हा दुर्मिळ पक्षी आहे. तो गुजरात, केरळ व पश्‍चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यांवर शीत ऋतूदरम्यान स्थलांतरित होतो.

महाराष्ट्रात याची नोंद क्‍वचितच आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच याची नोंद आहे व विदर्भातील आजवरची दुसरी नोंद आहे. त्यामुळे यवतमाळच्या पक्षी गणनेमध्ये अशा पक्ष्यांची नोंद दुर्मिळ आहे व आम्ही फार आनंदी आहोत, असे डॉ. प्रवीण जोशी म्हणाले.

Web Title: kantheri chikhalya bird watch