चिमुकल्यांचे अपहरण करणारा जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नागपूर - चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांचे अपहरण करण्यात आले. यानंतर अपहरणकर्ता दोघांनाही सुरादेवीच्या जंगलात सोडून पळून गेला. पालकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुले सुखरूप गवसली. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत आरोपी दिलबागसिंग सुच्चासिंग गिल (३२, रा. फ्रेण्ड्‌स मिलमागे, पांझरा) याला जेरबंद केले.

गिल मालिश करून देण्याचे काम करतो. अपहृत पाच वर्षीय निधी बावणकर व दीड वर्षीय दद्दू, दोघेही महादुला, श्रीवासनगर येथील रहिवासी आहेत. गिलची या भागात ये-जा असल्याने सर्वच त्याला ओळखतात. शनिवारी दुपारी निधी आणि दद्दू घराजवळ खेळत असताना दिलबाग तिथे आला. चॉकलेट घेऊन देतो आणि गाडीवर फिरवून आणतो, असे सांगत दोघांनाही मोटारसायकलवर घेऊन गेला. कोराडीदेवी मंदिराकडे जात असताना निधीचे वडील राजकुमार यांनी बघितले. त्यांनी हाकही दिली; मात्र दिलबाग थांबला नाही. वडील पायी असल्याने त्यांना पाठलाग करणे शक्‍य झाले नाही.

सुरादेवी जंगलाकडे जात असताना सुरक्षारक्षकाने दिलबागला हटकून हुसकावून लावले. यानंतर दोन्ही मुलांना जंगलातच सोडून दिलबाग निघून गेला. इकडे निधी दिसत नसल्याने आईची शोधाशोध सुरू होती. वस्तीतील काही जणांनी दिलबाग दोन्ही मुलांना घेऊन गेल्याचे सांगितले. 

आईने लागलीच ठाणे गाठून तक्रार दिली. यानंतर निधीच्या आईवडिलांनी मुलांचा शोध सुरू केला. मुलांना रस्ता सुचत नसल्याने ते जंगलातच फिरत होते. सायंकाळी दोन्ही मुले जंगलात भटकताना मिळाली. यानंतर राजकुमार दोन्ही मुलांसह पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी गिलला अटक केली. मात्र, मुलांच्या अपहरणामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: kidnapers arrested in nagpur

टॅग्स