अस्वलाच्या हल्ल्यात मजूर मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

भामरागड (जि. गडचिरोली) - तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या मजुरांवर अस्वलाने हल्ला केला. यात एक मजूर ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी घडली.

भामरागड (जि. गडचिरोली) - तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या मजुरांवर अस्वलाने हल्ला केला. यात एक मजूर ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी घडली.

राजू विजा मज्जी (वय 45) आणि पत्नी सोनी यांच्यासह मेडदापल्ली गावातील काही नागरिक आज जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. तेंदूपत्ता तोडत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात राजू मज्जी जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी सोनी मज्जी आणि मजूर मुल्ला केसा मज्जी गंभीर जखमी झाले. त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स