अभ्यासक्रम बंदीसाठी पुन्हा पत्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नागपूर - शहरातील ‘नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (एपीटीआय) मधील ‘बीई पॉवर इंजिनिअरिंग’ अभ्यासक्रम बंद करण्यासाठी एनपीटीआयच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व महासंचालक आर. के. पांडे यांनी पुन्हा एकदा पत्र पाठविले. पत्रात अभ्यासक्रम बंद करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याची मागणीही कुलगुरूंना केली आहे.  

नागपूर - शहरातील ‘नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (एपीटीआय) मधील ‘बीई पॉवर इंजिनिअरिंग’ अभ्यासक्रम बंद करण्यासाठी एनपीटीआयच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व महासंचालक आर. के. पांडे यांनी पुन्हा एकदा पत्र पाठविले. पत्रात अभ्यासक्रम बंद करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याची मागणीही कुलगुरूंना केली आहे.  

‘एनपीटीआय’मधील बीई पॉवर इंजिनिअरिंग कोर्स शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून तातडीने बंद करण्याचा निर्णय संस्थेतील स्थायी समितीने घेत, त्यासंदर्भातील पत्र विद्यापीठाला पाठविले. यासंदर्भात बीसीयूडी संचालक डॉ. दिनेशकुमार अग्रवाल यांनी संस्थेत समिती पाठवून अहवाल अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. तसेच कुलगुरूंनीही संस्था बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि महासंचालक पांडे यांनी एनपीटीआयतील बीई पॉवर इंजिनिअरिंग कोर्स स्थानिक व देशभरातील विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. 

महत्त्वाचे म्हणजे ‘बीई पॉवर इंजिनिअरिंग’ असा अभ्यासक्रम असलेली ‘एनपीटीआय’ एकमेव संस्था आहे. त्यात दरवर्षी १०० टक्के प्रवेश होतात आणि ९० टक्‍क्‍यांपर्यंत विद्यार्थ्यांना थेट रोजगार मिळत असल्याचे नमूद केले होते. परंतु, सदर अहवाल महासंचालकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी पुन्हा दुसरे पत्र कुलगुरू डॉ. काणे यांना प्राप्त झाले. यासंदर्भात कुलगुरू डॉ. काणे यांना विचारणा केली असता, त्यांनी संस्थेतील अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णयच घेतल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याने महासंचालकांचे दुसरे पत्र मिळाले असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हा अभ्यासक्रम का बंद करावा त्याची कारणे दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

महासंचालकांशी करणार चर्चा
विद्यापीठ अधिकारी आता दोन दिवसांत महासंचालकांशी येत्या एक-दोन दिवसात ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे चर्चा करणार असल्याचे समजते. तसेच विद्यापीठाचे काही अधिकारी थेट महासंचालकांची भेट घेऊन अभ्यासक्रम बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत विनंती करणार आहेत. मात्र, यापूर्वीच संस्थेतील स्थायी समितीला अभ्यासक्रम बंद करण्याची घाई का झाली, हे कळायला मार्ग नाही. कुठल्याही स्थितीत विद्यापीठाकडून नाहरकत प्राप्त करून ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) प्रस्ताव सादर करायचा आहे.

विदर्भ

नागपूर - माथाडी कामगारांचे वेतन चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन आठवड्यांमध्ये नव्याने निश्‍चित करा, असा आदेश बुधवारी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नागपूर - अकरावी-बारावीचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत नसले तरी त्याच वर्गातील मुलांच्या भरवशावर खासगी क्‍लासेसची...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नागपूर - ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे गोरखपूर येथील रुग्णालयात ७० चिमुकले दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017