सीमावर्ती भागात नक्षल अभियान जोमात

File photo
File photo

गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात तिमेनारच्या जंगलात गुरुवारी (ता. 19) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले. या घटनेमुळे नक्षलवादी जिल्ह्यात शिरकाव करण्याची शक्‍यता असल्याने सीमावर्ती भागात गडचिरोली पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान तेज केले आहे.
गडचिरोली जिल्हाच्या सीमेलगत ही मोठी घटना घडल्याने बदला घेण्याच्या हेतूने नक्षलवादी घातपात घडवून आणू शकतात, अशी शक्‍यता आहे. काही महिन्यांपूर्वी भामरागड तालुक्‍यातील कसनसूर येथे झालेल्या चकमकीत 40 नक्षलवादी मारले गेले होते. त्यानंतर छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायात वाढ केली होती.
दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याने या संघटनेला मोठा धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड-महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील राजनांदगाव जिल्ह्यातील औंध क्षेत्रातील कुंडालच्या जंगलामध्ये आयटीबीपी आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका महिला नक्षलीला कंठस्नान घालण्यात आले होते. या महिलेवर पाच लाखांचे बक्षीस होते. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा गडचिरोली जिल्ह्यात हिंसक घटना घडवून आणण्यात सहभाग होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com