नागपूरचा मोर्चा ठरेल ऐतिहासिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

नागपूर - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह अन्य मागण्यांकरिता उपराजधानीतील सकल मराठा मूक मोर्चा १६ ऑक्‍टोबरला आयोजित केला आहे.

नागपूर - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह अन्य मागण्यांकरिता उपराजधानीतील सकल मराठा मूक मोर्चा १६ ऑक्‍टोबरला आयोजित केला आहे.

यशवंत स्टेडियम, रविनगर विद्यापीठ मैदान या दोन ठिकाणांहून मोर्चा निघेल. दोन्ही मोर्चांचा व्हेरायटी चौकात संगम झाल्यानंतर संविधान चौकमार्गे कस्तुरचंद पार्कवर समारोप होईल. शांततापूर्ण व शिस्तबद्ध विक्रमी मोर्चांनी राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष  वेधले. आता नागपूरच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष आहे. मोर्चाच्या यशस्वितेसाठी दररोज विविध संघटनांच्या बैठकी सुरू आहेत. सक्करदरा चौकातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सभागृहात, मराठा सेवा संघाच्या भाऊसाहेब सुर्वेनगरातील बळीराजा 

नागपूरचा मोर्चा ठरेल ऐतिहासिक

भवनात बैठकी झाल्या. यावेळी समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी होण्यासाठी विविध संघटनादेखील आयोजकांच्या संपर्कात आहेत. मोर्चात वर्धा, हिंगणघाट, मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील समाजबांधवांसह विदर्भाच्या अन्य शहरातून नागरिक येण्याची शक्‍यता आहे. अधिक माहितीसाठी सक्करदरा चौक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

असा होईल संगम 
पश्‍चिमेकडून येणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते रविनगरातील विद्यापीठाच्या मैदानावर एकत्र येतील. यानंतर अमरावतीमार्गे मोर्चा सुरू होऊन महाराज बागेसमोरील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात येईल. पूर्वेकडून येणारे मोर्चेकरी यशवंत स्टेडियममध्ये जमतील. दोन्ही मोर्चांचा व्हेरायटी चौकात संगम होईल. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण केल्यानंतर मोर्चा संविधान चौकात पोहोचेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केल्यानंतर मोर्चेकरी कस्तुरचंद पार्कवर जातील. 
 

मंचावर केवळ महाविद्यालयीन विद्यार्थिनी 
समारोपासाठी कस्तुरचंद पार्कवर मंच उभारण्यात येईल. या ठिकाणी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थिनीच असतील. त्या निवेदन वाचून दाखवतील त्यांचेच एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देतील. राष्ट्रगीतानंतर समारोप होईल. 

 

संघटनांच्या बैठका
मूक मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. २) वकील संघाची बैठक पार पडली. यात मोर्चासंबंधी विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीला दीडशे वकील उपस्थित  होते.

Web Title: maratha kranti morcha in nagpur