बारा दिवसाच्या बालिकेचा आजारपणात मृत्यु

Marathi news Death of a 12-day child's illness
Marathi news Death of a 12-day child's illness

एटापल्ली - तालुक्यातील गोडेली येथील एका बारा दिवशीय बालिकेचा साधारण तापाच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यु झाला.  

मृत बालिकेच्या आईचे नाव शितल जयपाल टोप्पो असे असून तिने बारा दिवसाअगोदर एका गोंडस बालिकेला जन्म दिला हेता. ती (ता. 23) गुरुवार रोजी तापाने फनफनत असल्याने तिला सायंकाळी 5 वाजता दरम्यान ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र (ता. 24) शुक्रवार रोजी पहाटे तिन वाजता दरम्यान तिचा मृत्यु झाला. माझ्या मुलीला योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यु झाला असल्याचा आरोप बालिकेचे वडील जयपाल टोप्पो यांनी केला असून चौकशी करुन न्याय मिळण्याची मागणी केली आहे. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाची दैनावस्था असून येथे वैद्यकीय अधिका-यांची पदे रिक्त आहेत. तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचारी नेहमीच कर्तव्यावरून गैरहजर राहत असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. त्यामुळे रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सदर बालिका रुग्णालयात उपचारास दाखल झाली. नंतर सर्व तपासण्याकरुन उपचार सुरु करण्यात आला. मात्र तिची आई मलेरिया बाधित असल्याची बाब नातेवाईकांनी लपवून ठेवल्याने योग्य उपचार करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे बालिका दगावली, असे येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. राकेश नागोसे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com