शासकिय अभियांत्रिकीत 'सकाळ- यिन संवाद' कार्यक्रम 

marathi news government engineering college sakal YIN sanmavad program
marathi news government engineering college sakal YIN sanmavad program

जळगाव - जातीय हिंसा, धार्मिक तणाव दूर सारण्यासाठी सोशल मिडीया दूर करावा लागणार. जाती, धर्म, भाषा यापलिकडे जाऊन समाजाची उभारणी करण्यासाठी युवकांनी कटीबद्ध होण्याची गरज आहे. समाज वारंवार असे विद्वेश वाढवून स्वतःचा आणि एकंदरीत विकासाला खिळ बसू नये; यासाठी समाजाने माध्यमांचा वापर सजगपणे करण्याची गरज आहे. करीअर आणि सामाजिक उन्नतीला प्राधान्य देत, राष्ट्र उभारणीसाठी पुढे यावे. त्यातही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना केवळ अभियंता न बनता सोशल अभियंता बनण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 'यिन संवाद' कार्यक्रमातून केले. 

'सकाळ'च्या 'यंग इंन्स्पिरेटर नेटवर्क'च्या माध्यमातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने युवा दिनाचे औचित्य साधून शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात आज यंदाच्या मोसमातील पहिला 'यिन संवाद' कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम. जे. साबळे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, प्रा. जी. के. अंदुरकर, प्रा. जी. एम. माळवदकर उपस्थित होते. सीईओ दिवेगावकर म्हणाले, की राज्यातील ग्रामीण भागाचे अस्तित्व कमी होत चालले आहे. आज आर्थिक विषमता आली असे म्हटले जातेय, पण 50 वर्षांपुर्वी देखील हे चित्र होते. आजच्या स्थितीला गावातून जितका पैसा बाहेर जातोय; त्यापेक्षा कमी पैसा हा गावात येत असल्याने तोटा निर्माण होतोय. याकरीता आपण एखाद्या कंपनीत जाऊन मशिन्स व्हायचे, की समस्या दूर करणारा अभियंता व्हायचे हे अगोदर समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच समाजात होणाऱ्या जातीय हिंसा, धार्मिक तणाव हा सोशल मिडीयावरुन अधिक वाढतोय. यामुळे सोशल मिडीया घातक ठरू लागलाय. यामुळे जनतेने प्रश्‍न विचारायला शिकायला हवे. हे वादाचे मुद्दे टाळायचे नाही, तर ते समजून घ्यायला हवेत. 

विद्यार्थ्यांशी चर्चा करताना ते म्हणाले, की प्रशासन म्हणजे न कंटाळता परिस्थिती सांभाळावी लागते. प्रत्येक करीअर हे मनोरंजकच असते. पण आपल्याला काय आवडते, हे महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला काय करायचेय हे सापडले तर त्यात पारंगत होवून करीअरच्या वाटा सुकर होतील. जगासाठी त्याचे काय? हे याठिकाणी उपयोगाचे नसल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे घरच्यांना देखील समजावून सांगता आले पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com