अकोला: अवैध सावकारी रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथक

योगेश फरपट
शनिवार, 24 जून 2017

अकोला - सावकारग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील अवैध सावकारांचा बिमोड करण्यासाठी तालुकास्तरावर पथके कार्यान्वित करण्यात येतील अशी ग्वाही जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय यांनी दिली. सावकाराकडे जमिनी गहाण ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी शनिवारी (ता.24) शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

खासदर सुप्रियाताई सुळे अकोल्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यातील सावकारग्रस्त शेतकरी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी आज (शनिवार) चर्चा केली. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्‍त्या डॉ. आशा मिरगे यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. अकोला जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराच्या ताब्यात आहेत. तर काही नावे आहेत. जुन्या कायद्याच्या कलम 13 अ नुसार जे अहवाल तयार होवून जे सावकार दोषी आढळून आले आहेत, त्या प्रकरणात नव्या कायद्यानुसार कारवाई अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय यांनी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष अरूण इंगळे यांच्याकडून प्रकरणाची माहिती जाणून घेतली. यावर पुढील तीन महिन्यात सावकारी प्रकरणे संपूर्ण माहिती घेऊन निकाली काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला जिल्ह्यातील बहुसंख्य सावकारग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

सावकार शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. सहायक निबंधकांनी शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आमची भूमिका मांडली आहे.
- अरूण इंगळे, प्रदेशाध्यक्ष, सावकारग्रस्त शेतकरी समिती

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजू समजून घेतली. प्रत्येक तालुक्‍यात भरारी पथक नेमण्यात येईल. अवैध सावकारी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- गोपाल माळवे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था