आठ वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न; विकृत युवकास अटक 

जितेंद्र सहारे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

चिमुर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर पोलिस स्थानकांतर्गत हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ल्यावरील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील आवारात आठ वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली. 

या शाळेच्या आवारात ही बालिका समवयस्क मैत्रिणींबरोबर सायंकाळी 5.30 च्या सुमारास खेळत होती. त्यावेळी गांधी वॉर्डमध्ये राहणाऱ्या 25 वर्षांच्या युवकाने त्या बालिकेस जबरदस्तीने ओढून नेले. हा तरुण तिला शाळेच्या परिसरातील स्वच्छतागृहात घेऊन गेला. तिथे अश्‍लील चाळे करण्याच्या प्रयत्नांत असतानाच त्या मुलीने आरडाओरडा केला. यामुळे त्याने तिला सोडून दिले. 

या मुलीची आणि काकू शेतमजुरी करतात. त्या रात्री कामावरून घरी आल्यानंतर या मुलीने ही घटना सांगितली. त्यानंतर चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात रात्री 11.42 वाजता गुन्हा नोंदविला. त्यानंतर 11.47 वाजता त्याला अटक झाली. पुढील तपास ठाणेदार दिनेश लबडे करत आहेत.