मुद्रांक विक्रेत्यांचा बंद; खरेदी-विक्रीचे व्यवहारांवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

अकाेला : राज्यात प्रचलित असलेली छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेऊन त्यांवर विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मुद्रांक विकेत्यांनी साेमवारपासून (ता. ९) संप सुरु केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रभावित झाल्याने नागरिकांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. 

प्रचलित मुदांक विक्री व्यवस्था चालू ठेवावी, त्यावर विक्रेत्यांना १० टक्के कमीशन मिळावे. राज्यात सुरु असलेली ई-चलन व ई-एसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फतच राबविण्यात यावी, मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना वारसाहक्काने परवाना मिळावा, एएसपी ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी यासह अन्य मागण्यांसंदर्भात शासन मान्य मुद्रांक विक्रेता, अर्ज व दस्तलेखक संघटनेच्या वतीने राज्यभर संप पुकारण्यात आला आहे.

सरकार संघटनेच्या मागण्यांची दखल घेत नसल्याने सोमवारपासून (ता. ९) संघटनेच्या वतीने बेमुदत संप सुरु करण्यात आला आहे. महसूलमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा होऊनही कोणताही निर्णय झालेला नसल्याने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

दरम्यान मुद्रांक विक्रेत्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील संपत्ती खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रभावित झाले आहेत. शासनाने याकडे लक्ष दिले नाही तर नागरिकांना अडचणींना सामाेरे जावे लागेल. आंदाेलनामध्ये संघटनेचे दिपक बाेरकर, शशिकांत वाघ, देवेंद्र देशमुख, नरेंद्र देशमुख, नरेंद्र मुदीराज, जगदेव पारधी, देवानंत अंभाेरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी आहेत.