सिन्नरमधील हत्येप्रकरणी उस्मानाबादमधून दोन संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

उस्मानाबाद : नाशिक पोलीसांनी मंगरुळ (ता.कळंब) येथील भागचंद बागरेचा व महानंदा बनसोडे या दोघांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे. शिराढोण पोलीस ठाण्याकडूनही त्याला दुजोरा दिला असून चौकशीसाठी त्याना नाशिकला घेऊन गेल्याचेही पोलीसांनी सांगितले आहे.

सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर आकस्मिक मृत्युची नोंद झालेल्या या प्रकऱणात त्याना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 23 फेब्रुवारीच्या दिवशी दाकली शिवारात 30 ते 35 वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्युची नोंद कऱण्यात आली होती. या मृतदेहाच्या डोक्यावर , गळ्यावर , पाठीवर गंभीर मारहान झाल्याचे आढळून आले होते. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यु झाल्याची पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये नोंद आहे. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने आकस्मिक मृत्युची नोंद कऱण्यात आली होती.

हा मृतदेह मंगरुळ (ता. कळंब) येथील बालाजी बनसोडे यांचा असल्याची माहिती मिळाल्याने त्यामुळेच नाशिक पोलीसांनी या गावामध्ये येऊन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची चर्चा आहे.  या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीसांनी जिल्हा बँकेचे माजी संचालक भागचंद बागरेचा व बालाजी यांची पत्नी महानंदा या दोघांना शुक्रवारी (ता. 25 ) रात्री उशीरा ताब्यात घेतले असून त्याना नाशिकला घेऊन गेले. सिन्नर एमआयडीसीचे पोलीस निरिक्षक प्रभाकर कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी कारवाई झाली असल्याचे सांगितले. पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती श्री. कोल्हे यानी दै.सकाळ ला दिली आहे. 

गावातील या दोघांना काल पोलीसांनी ताब्यात घेतल्याने ही बातमी वा-यासारखी जिल्ह्यामध्ये पसरली असून सोशल मिडीयावर वेगवेगळ्या चर्चा सध्या सूरु झाल्या आहेत. या घटनेचे गुढ लवकरच उलगडणार असे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.