काम न करताच सफाई कर्मचारी उचलतात वेतन

Nagpur-Municipal
Nagpur-Municipal

नागपूर - साडेचार हजार सफाई कर्मचारी व चार हजार ऐवजदार असूनही शहर स्वच्छतेत मागे का, असा सवाल करीत सदस्यांनी अनेक कर्मचारी कामे न करताच वेतन घेत असल्याकडे लक्ष वेधले. महापौर नंदा जिचकार यांनी स्वच्छतेसाठी ज्या उपाययोजना केल्या जातात त्यात सफाई कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा समावेश करण्याचे निर्देश दिले.

सत्ताधारी नगरसेविका नसिम बानो यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात सफाई कर्मचारी कामे करीत नसतानाही हजेरीपत्रकात त्यांच्या नावाची नोंद केली जात असल्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. यावर विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनीही अनेक सफाई कर्मचारी कामावर न येताच वेतन घेत असल्याचा आरोप केला. अधिकारीच कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी लावत असून कमिशन घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

बाल्या बोरकर यांनी सफाई कर्मचारी घरूनच जमादाराला फोनवर हजेरी लावण्यास सांगत असल्याचे नमुद केले. 

प्रकाश भोयर यांनी सफाई कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ वेतन मिळते, त्यामुळे भविष्यात त्यांची पदे भरण्याऐवजी ऐवजदारांकडूनही कामे करून घ्यावी, अशी सूचना केली. सफाई कर्मचाऱ्यांची वेळ सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत असते. परंतु, अनेकजण यावेळी गायब असल्याचे आढळल्याचे काही सदस्यांनी सभागृहात सांगितले. यावरून सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी झोनल अधिकाऱ्यांनी प्रभागात काम करणाऱ्या प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी नगरसेवकांकडे द्यावी, असे निर्देश प्रशासनाला द्यावे, अशी विनंती महापौरांकडे केली.

यादी उपलब्ध करून द्या
संदीप जोशी यांनी कर्मचारी दुसऱ्याच कुणाला कामावर पाठवून वेतन घेतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली. महापौर नंदा जिचकार यांनी प्रभागातील कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी नगरसेवकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com