संयुक्त खतांच्या किंमतीत वाढ

fertilizer
fertilizer

नागपूर : वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली असतानाच आता सरकारनेसुद्धा शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर घालत खरीप हंगामापूर्वीच खताच्या किमतीत भरघोस वाढ केली आहे. युरिया वगळता कॉम्प्लेक्‍स खतांच्या किमतीत ही वाढ करण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या सूत्रांनी दिली. 

कॉम्पलेक्स खतामध्ये स्फुरद, पोटॅश, नत्र या तीन घटकांचा समावेश राहतो. याउलट युरीयाच्या माध्यमातून पिकाला फक्त नत्राचा पुरवठा होतो. नियंत्रित खताचा पुरवठा करण्यास तज्ज्ञांकडून सातत्याने सांगितले जाते; परंतु शासनानेच या उद्देशाला हरताळ फासण्याचा निर्णय घेत खताच्या किमतीत भरघोस वाढ केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सततची नापिकी, दुष्काळ, त्यातच रबी हंगामात झालेला अवकाळी पाऊस, वारा आणि गारपीट यामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या वर्षीच्या हंगामासाठी पैशाची सोय करण्याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे, अशी स्थिती असताना शासनाने त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची चिंता वाढविण्याचे काम खत दरवाढीच्या माध्यमातून केल्याचा आरोप होत आहे. 

५० किलो खताची बॅग. पूर्वीचे दर (चौकटीत वाढीव दर)
इफ्को  ः
डिएपी - १०७६ रुपये (१२०० रुपये)
१०:२६:२६  - १०५५ रुपये (११३५ रुपये)
२०:२०:०:१३  - ८५० रुपये (९३० रुपये)

कोरोमंडल
डिएपी - १०८१ रुपये (१२१५ रुपये)
१०:२६:२६  - १०४४ रुपये (११५० रुपये)
२०:२०:०:१३  - ८७३ रुपये (९३० रुपये)

आरसीएफ
१५:१५:१५  - ८८७ रुपये (९७१ रुपये)

झुआरी ऍग्रो
डिएपी - ११०५ रुपये (१२३० रुपये)
१०:२६:२६  - १०७६ रुपये (११५० रुपये)
२०:२०:०:१३  - ८७२ रुपये (९३५ रुपये)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com