परीक्षेचा पहिला दिवस शांततेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नागपूर - बारावीची परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू झाली. पहिलाच पेपर  असल्याने पेपर शांतपणे सोडव, गडबड करू नको, गोंधळून जाऊ नको अशा सूचना स्वीकारत बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. तज्ज्ञाच्या मते पेपर सोपा आणि व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. नागपूर विभागातून या वर्षी सहा जिल्ह्यांतून एकूण एक लाख ७२ हजारावर परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.  

नागपूर - बारावीची परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू झाली. पहिलाच पेपर  असल्याने पेपर शांतपणे सोडव, गडबड करू नको, गोंधळून जाऊ नको अशा सूचना स्वीकारत बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. तज्ज्ञाच्या मते पेपर सोपा आणि व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. नागपूर विभागातून या वर्षी सहा जिल्ह्यांतून एकूण एक लाख ७२ हजारावर परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.  

विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यांतील एकूण ४५२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. शहरातील डॉ. आंबेडकर कॉलेज, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धरमपेठ सायन्स, धनवटे कॉलेज आदी परीक्षा केंद्रे सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षार्थ्यांच्या गर्दी झाली होती.

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आईवडील, आजी-आजोबांसह अन्य नातेवाईक यांचे आशीर्वाद घेऊन, तर काहींनी सकाळी विविध मंदिरांत जाऊन दर्शन घेतले. आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी काही पालकांनी सुटी घेतली होती. तर काहीजण अर्धी रजा घेतली होती.  केंद्राबाहेरील परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनी नोट्‌स, पुस्तकांवर अखेरची नजर टाकली.

काहीजणांनी चर्चेतून उजळणी केली. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला. त्यांना पेपरप्रारंभाच्या अर्धा तास आधी केंद्रात सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांना पेपर नीट वाचता यावा, ते गोंधळून जाऊ नयेत यासाठी दहा मिनिटे आधी पेपर देण्यात आला. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त होता. परीक्षेतील पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या विभागाची भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. पालक, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी पेपर सुटेपर्यंत आपल्या पाल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर थांबून होते. उद्या, गुरुवारी (ता. २२) सकाळी अकरा ते दोनदरम्यान हिंदीचा पेपर घेण्यात येईल. 

काहीसा तणाव
पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. पेपर सुटल्यानंतर पेपर सोपा  होता, पेपर चांगला लिहिला, हुश्‍श... झाला इंग्रजीचा पेपर अशा प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी व्यक्त केल्या. पेपर झाल्यानंतर केंद्राच्या आवारात एकमेकांशी पेपरबाबत परीक्षार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. बहुतांश परीक्षार्थ्यांनी दुसऱ्या पेपरची तयारी करण्यासाठी लवकर घरी जाण्यास प्राधान्य दिले.

दहा कॉपी पकडल्या
कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षापासून कडक पावले उचलण्यात आलेली आहेत. असे असले तरी कॉपीचे तुरळक प्रकार घडलेच. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तर सीसीटीव्हीची परीक्षा केंद्रावर नजर होती. तरी विभागामध्ये दहा कॉपीची प्रकरणे समोर आली. यात भंडारा एक, चंद्रपूर चार, गडचिरोली चार, गोंदिया एक अशी ही प्रकरणे वगळता उर्वरित सर्वच केंद्रांवर इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.

Web Title: marathi news nagpur news hsc exam