नागपुरात पत्रकाराच्या आई, मुलीची निर्घृण हत्या 

nagpur
nagpur

नागपूर : उपराजधानीतील पत्रकाराची आई व मुलीचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. अज्ञात आरोपीने दोघींचीही हत्या केल्यानंतर मृतदेह वेगवेगळ्या पोत्यात भरून बहादुरा परिसरातील संजुबा शाळेजवळील नाल्यात फेकून दिले. रविवारी सकाळी फिरायला जाणाऱ्यांना ही पोती दिसून आल्यानंतर घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

न्यूज पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांची 54 वर्षीय आई आणि दीड वर्षीय मुलगी शनिवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास पायातील पैजण घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या. तेव्हापासून नात आणि आजी बेपत्ता होता. रात्रीपासून कुटूंबियांनी दोघींचाही शोध सुरू केला होता. रविवारी सकाळी फिरायला जाणाऱ्यांना बहादुरा येथील संजुबा शाळेमागील भागातून जाणाऱ्या नाल्यात दोन पोती बेवारस अवस्थेत आढळली. पोत्याच्या आकारावरून शंका निर्माण झाली. यामुळे पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पोते उघडले असता, आजी आणि नातीचे मृतदेहच आढळले.

कांबळे कुटूंबियांनी जाऊन बघितले असता दोघींचीही ओळख पटली. आरोपींनी दिघोरी परीसरातून दोघींचे अपहरण केले असावे, त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्यांची हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून नाल्यात टाकून दिले. दोघींचाही गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शीनी दिसून येत आहे. हुडकेश्‍वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com