शहरावर भीषण जलसंकट 

शहरावर भीषण जलसंकट 

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगावखैरीसह पेंच प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे. गेल्या सव्वा महिन्यात नवेगाव खैरीतील पाणीसाठ्यात २५ टक्के तर पेंचमधील पाणीसाठ्यात ५० टक्‍क्‍यांनी घट झाली असल्याने यंदाचा उन्हाळा नागपूरकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरणार आहे. मार्च महिन्यात ही स्थिती असल्याने एप्रिल, मेमध्ये नागपूरकरांना पाणी मिळेल की नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शहरावर भीषण जलसंकट घोंगावत आहे. त्यामुळे २४ बाय ७ पाणी नव्हे तर २४ बाय ७ कोरडे शहर, अशी नागपूरची दुर्दशा होण्याची शक्‍यता बळावली आहे. राज्यातील इतर विभागाचा  अपवाद वगळता नागपूर विभागात केवळ २१ टक्के पाणीसाठा आहे. आता उन्हाळा तापण्यास सुरुवात झाली असून जलसाठ्यानेही तळ गाळण्यास सुरुवात झाल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. मागील महिन्यात ४ फेब्रुवारी रोजी नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरीत ५०.८७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, आज येथे केवळ ३९.४५ टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे नवेगाव खैरी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्यानंतर पेंच धरणातून या जलाशयात पाणी पुरविले जाते. ४ फेब्रुवारी रोजी पेंच धरणात २९.३२ टक्के पाणीसाठा होता. आज, १३ मार्च रोजी या धरणात केवळ १५.५१ टक्के पाणीसाठा आहे. केवळ सव्वा महिन्यात या दोन्ही जलसाठ्यातील  पाण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एवढेच नव्हे १३ मार्च २०१७ च्या तुलनेतही या दोन्ही धरणात कमी पाणी उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर कन्हान नदीही कोरडी पडण्याच्या स्थितीत आहे. ही सर्व आकडेवारी बघता शहरावर जलसंकटाची टांगती तलवार आहे. या स्थितीत महापालिका प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, नुकताच समित्यांच्या सभापतींची निवड झाल्याने ते हारेतुरे स्वीकारण्यात व्यस्त आहेत. यात जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांचाही समावेश आहे. त्यामुळे यंदा नागपूरकर पाण्याबाबत ‘राम भरोसे’च असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  

उन्हाळ्यात कुठून आणणार पाणी?  
दरवर्षी उन्हाळ्यात घराघरांत कुलर सुरू होतात. त्यामुळे पाण्याच्या मागणीत वेगाने वाढ होते. सध्या शहराला ६३० एमएलडी पाण्याची गरज असून ती पूर्ण केली 

सत्ताधारी, प्रशासनाची केवळ चर्चाच 
शहरावर पाणीसंकटाच्या बाबतीत यापूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत पेंच धरणातून शहराला होणाऱ्या पाण्याच्या आरक्षणात कपातीचा पाटबंधारे विभागाच्या निर्णयाचा खरपूस समाचार महापौरांनी घेतला. पाण्यात कपात होऊ नये, यावर बैठकीत जोर  देण्यात आला. परंतु, या जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. याबाबत चर्चा तर नाहीच, साधा विचारही अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांनी केला नाही.  

योजनेबाबत हातावर हात 
शहरात उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्‍यता बघता महापालिकेने १२ कोटींची पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मागील महिन्यात मंजुरी दिली. विहिरीतील गाळ काढणे, विद्युत पंप बसविणे, नवीन बोअरवेल खोदण्याच्या कामाचा प्रस्तावात समावेश आहे. मात्र, याबाबत प्रत्यक्ष कामकाजाला अद्याप सुरुवात झाली नाही. परिणामी यंदा उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या  पाण्यासह बाहेर वापराच्या पाण्याचीही टंचाई जाणवणार आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी ७०० एमएलडीपर्यंत वाढते. 

जलाशयाची सध्याची स्थिती बघता महापालिका नागपूरकरांची गरज कशी भागविणार? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सध्या महापालिका पाण्याची गळती कमी करण्यावर भर देत आहे. याशिवाय विहिरींची स्वच्छता, बोअरवेल आदी कामेही केली जाणार आहे. मात्र, यंदा पाणीच कमी असल्याने नागरिकांनीही पाणी जपून वापरावे. याबाबत जनजागृती करण्यात येईल. वेळ पडल्यास शहरात पाणी कपातही केली जाऊ शकते. 

- नंदा जिचकार, महापौर. 

पाऊस अन्‌ जलाशयांची स्थिती बघता सद्य:स्थितीत पाणीबचतीवर जनजागृती हा एकमेव पर्याय आहे. मात्र, महापालिकेला याबाबत भानच नसल्याचे चित्र आहे. अद्याप याबाबत कुठलाही कार्यक्रम आखला नाही. पाणी बचतीवर व्यापक जनजागृतीसाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. 

- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ, संस्थापक ग्रीन व्हिजिल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com