मनोरुग्ण भावाचा बहिणीवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

नागपूर - मोबाईलसाठी झालेल्या वादातून भावाने बहिणीच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बुधवारी पाचपावलीत घडली.
 
नागपूर - मोबाईलसाठी झालेल्या वादातून भावाने बहिणीच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बुधवारी पाचपावलीत घडली.
 
मिताली रणवीरसिंग चौहान (30, प्रियदर्शनी हौसिंग सोसायटी, पाचपावली) असे जखमी बहिणीचे, तर ऋत्विक रणवीरसिंग चौहान (37) असे आरोपी भावाचे नाव आहे. ऋत्विक हा एका डोळ्याने अंध आहे, शिवाय तो मनोरुग्णही असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी बहीण- भावात मोबाईलच्या कारणावरून वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या ऋत्विकने भाजी चिरण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी भावाला अटक केली आहे.