‘मेट्रो’च्या मालमत्तांतून मनपा होणार मालामाल

राजेश प्रायकर
मंगळवार, 29 मे 2018

नागपूर - महापालिकेने शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आतापर्यंत २९६.६० कोटींची जागा दिली. दिलेल्या एकूण जागेपैकी अकरा ठिकाणी महापालिकेची ५० टक्के भागीदारी राहणार आहे. महामेट्रो या जागांवर स्टेशनसह व्यावसायिक संकुलेही उभी करणार आहे. यामुळे यातील निम्मे उत्पन्न वाट्याला येणार असून आर्थिक संकटातील महापालिकेला नवी उभारी मिळणार आहे. 

८ हजार ६८० कोटींच्या मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेलाही ५ टक्के अर्थात ४३० कोटींचा वाटा द्यायचा आहे. 

मेट्रो प्रकल्पाला महापालिका मोक्‍याच्या जागा देत आहे. मेट्रोला देय असलेल्या एकूण रकमेचे ‘बुक ॲडजेस्टमेंट’ जागेतून करण्यात येणार आहे. आतापर्यंत २९६.६० कोटींची २१ लाख ९१ हजार चौरस मीटर जागा मेट्रोला देण्यात आल्याची माहिती मनपा स्थावर विभागाने दिली. यापुढेही काही जागांची मेट्रोला गरज पडणार असल्याने महापालिकेला प्रकल्पासाठी निधी देण्याची गरज राहणार नाही. एवढेच नव्हे, तर जागा देताना महापालिकेने तेथे तयार होणाऱ्या रेल्वे स्टेशनवरील व्यावसायिक संकुलातून मिळणाऱ्या उत्पन्नात ५० टक्के भागीदारी मागितली आहे. महापालिकेला एकीकडे प्रकल्पासाठी देय रक्कम देण्याची गरज राहणार नाही, शिवाय दिलेल्या मालमत्तांतून उत्पन्नाचेही स्त्रोत निर्माण होणार आहे. परिणामी महापालिकेला शहराच्या विकासकामांवर खर्च करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे.

१५ जागांचे हस्तांतरण
महापालिकेने मेट्रो रेल्वेला आतापर्यंत ९ जागा हस्तांतरित केल्या असून ६ जागांबाबत हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. एकूण १५ पैकी ११ जागेवरील प्रकल्पात मनपा भागीदार राहणार आहे. यात प्रामुख्याने गोलबाजार गड्डीगोदाम येथील दोन, खोवा बाजार, कॉटन मार्केटमधील तीन, सीताबर्डीतील तीन जागांसह वीज माता मंदिर वर्धा रोड, गरोबा मैदान, अंबाझरीतील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

मेट्रोला दिलेली जागा 571.65 एकर
सरासरी प्रतिएकर दर 52 लाख रुपये

Web Title: metro property municipal