"मेट्रो रेल्वे'च्या गतीची पाहुण्यांना भुरळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो रेल्वेच्या गतीने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही आकर्षित केले. त्यांनी शहरातील प्रकल्पाच्या एकूण वेगाबाबत माहिती घेण्यास पाठविलेले राज्यमंत्री डॉ. पी. नारायण यांनाही मेट्रो रेल्वेच्या गतीने भुरळ पाडली. डॉ. पी. नारायण यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दौरा करीत विजयवाडा व विशाखापट्टणम मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी येथील अधिकाऱ्यांकडून "टिप्स' घेतल्या.

शहरात सव्वा वर्षाच्या मेट्रो रेल्वे मार्गावर गर्डर बसविण्याचे काम सुरू झाले. कामाची ही गती अनेकांसाठी आश्‍चर्य ठरत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यापर्यंतही या प्रकल्पाच्या गतीची माहिती पोहोचली. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम्‌ व विजयवाडा येथेही मेट्रो रेल्वेचा प्रकल्प सुरू आहे. मात्र, त्यांच्या संथगतीमुळे मुख्यमंत्री नायडू यांनी नागपूर मेट्रोच्या वेगाने होणारी कामे बघण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री डॉ. पी. नारायण यांना पाठविले होते. आज पी नारायण यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पाहणी केली. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. याशिवाय गतीने मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर प्रस्तावित तरतुदीनुसार खर्च होईल. त्यामुळे बचत होणार असल्याचा मंत्र दीक्षित यांनी दिला.

महापालिकेलाही भेट
राज्यमंत्री डॉ. पी. नारायण यांनी महापालिकेलाही भेट दिली. महापौर प्रवीण दटके यांनी त्यांचे स्वागत केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. नारायण यांना शहरातील 24 बाय 7 योजना, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, नागनदी प्रदूषण नियंत्रण योजना, पंतप्रधान आवास योजनेबाबत माहिती दिली. या वेळी डॉ. नारायण यांनी दर पौर्णिमेला वीजबचत योजनेची आवर्जून विचारपूस केली.