मीनाक्षी गजभियेंना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नागपूर -  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये अडकलेल्या मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहाणे यांना गुरुवारी (ता. 19) जिल्हा व सत्र न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. 

नागपूर -  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये अडकलेल्या मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहाणे यांना गुरुवारी (ता. 19) जिल्हा व सत्र न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. 

डॉ. गजभिये यांनी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात शरणागती पत्करल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यात आले. औषध विक्रेत्याला 15 हजारांची लाच मागितल्याच्या आरोप असलेल्या मेयो हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. गजभिये सीसीटीव्ही फुटेजच्या नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डिंगशी छेडछाड करून त्यांच्याविरुद्ध असलेला पुरावा नष्ट केल्याचा संशय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्यासमक्ष सादर करण्यात आले असता जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनवावी, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गजभिये यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गजभियेंतर्फे ऍड. वाय. पी. मंडपे यांनी बाजू मांडली. 

मिश्राचा निर्णय आज 
या प्रकरणातील डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहाणे यांच्यासोबतचा अन्य आरोपी विजय मिश्राला एसीबीने मंगळवारी (ता. 17) अटक केली होती. त्याने विशेष एसीबी न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर शुक्रवारी (ता. 20) सुनावणी होणार आहे.