गहाळ नाण्यांचा प्रश्‍न विधानपरिषदेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातन वस्तू आणि नाणी गहाळ झाल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान याप्रकरणात बऱ्याच कालावधीनंतर विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार नोंदविली. मात्र, अद्यापही प्रकरण थंडबस्त्यात आहे. दरम्यान बुधवारी या विषयावर विधानपरिषदेत आमदार नागोराव गाणार यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाद्वारे पोलिस कारवाई दाखल केल्याचे उत्तर दिली. 

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागात विविध ठिकाणी उत्खनानात सापडलेले प्राचीन अवशेष, मूर्ती तसेच नाणी ठेवण्यात येतात. विद्यार्थी यावर संशोधनदेखील करतात. याला नोंदणीकृत "अँटीक्वीटी' असे म्हणतात. याची विभागात दरवर्षी नोंद होते. याची यादीदेखील तयार करण्यात येते व विद्यापीठाकडून याची मोजणीदेखील होते. पवनार जवळील एका शेतात देशमुख नावाच्या एका व्यक्तीला 1968 साली काही मौल्यवान प्राचीन नाणी सापडली होती. या परिसरातच विभागातर्फे उत्खननाचे काम सुरू असल्यामुळे त्याने दोनशेहून अधिक नाणी विभागाकडे सुपुर्द केली होती. ही नाणी वाकाटककालीन होती. यात चांदी, सोन्याच्या नाण्यांचादेखील समावेश होता. आंतरराष्ट्रीय बाजारात नाण्यांची किंमत कोट्यवधी रुपयेदेखील येऊ शकते. या नाण्यांची छायाचित्रदेखील काढून ठेवण्यात आली होती. परंतु काही कालावधीनंतर संबंधित दोनशेहून अधिक नाणी विभागात नसल्याची बाब समोर आली. प्रदीप मेश्राम यांच्याकडून डॉ. प्रीती त्रिवेदी यांनी डिसेंबर 2013 मध्ये या विभागाचा कार्यभार घेतला. त्यावेळी केवळ प्रशासकीय चार्ज देण्यात आल्याचा दावा डॉ. त्रिवेदी यांनी केला. हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाकडे आल्यानंतर तत्कालीन प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी 31 मे 2014 रोजी चौकशीचे आदेश दिलेत. त्यानुसार याप्रकरणी 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 

विद्यापीठातून नाणी गायब 
समितीने सखोल चौकशी करून 15 जुलै 2014 रोजी आपला अहवाल सोपविला होता. या अहवालात अशाप्रकारची नाणी विद्यापीठात होती आणि ती बेपत्ता झाल्याचे नमूद करण्यात आले. तरीसुद्धा विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिस तक्रार करण्यात आली नव्हती. प्रसारमाध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर मागील आठवड्यात कुलगुरूंनी पोलिसांत तक्रार नोंदविली. 

Web Title: missing coins issue nagpur university