दोन शेतकऱ्यांच्या अकोल्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

मूर्तिजापूर/ म्हातोडी (जि. अकोला) - सोयाबीनला शेंगा न आल्याने गोरेगाव (ता. मूर्तिजापूर) आणि सततची नापिकीमुळे ग्राम लाखोंडा बुद्रुक (ता. अकोला) येथील दोन शेतकऱ्यांनी बुधवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. रोशन अर्जुन देवळे (वय 26), सुरेश रामेश्वर वावरे (वय 45) अशी त्यांची नावे आहेत.

देवळे यांच्या वडिलांच्या नावावर साडेपाच एकर शेती आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी साडेपाच एकर शेती त्यांनी ठेक्‍याने केली होती. मात्र पावसाअभावी पिकांना फटका बसला. त्यातच सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही. एक लाखाच्या वर कर्जाचा बोजा असल्यामुळे देवळे यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. वावरे यांच्यावर बॅंकेचे तसेच बचत गटाचे कर्ज असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. ते सततच्या नापिकीला कंटाळले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता.