पहिल्याच दिवशी धडकले चार मोर्चे

नागपूर - एलआयसी चौकात थांबलेल्या मोर्चात शासनाविरोधी निदर्शने करताना मोर्चेकरी.
नागपूर - एलआयसी चौकात थांबलेल्या मोर्चात शासनाविरोधी निदर्शने करताना मोर्चेकरी.

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. ११) विविध संघटनांच्या चार मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली. धनगर समाज बांधव, कोतवाल, अंगणवाडी सेविका व शेतमजुरांनी मोर्चांद्वारे मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. धनगर समाजाचा मोर्चा सर्वाधिक लक्षवेधी ठरला. दिव्यांग बांधवांना मोर्चा काढण्यापूर्वीच ताब्यात घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन
शेतमजूर व असंघटित कामगारांनी विधानभवनावर धडक देऊन मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. चाचा नेहरू बालभवन येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व राज्याध्यक्ष वंदना मेश्राम, मनोहर मुळे, विप्लव मेश्राम व मदन भगत यांनी केले. या मार्चाला एलआयसी चौकात अडविले. शेतमजुरांनी शासनविरोधी घोषणाबाजी करीत रस्त्यावर ठाण मांडले.

पोलिसांनी फेकले जेवण
धंतोली पोलिसांनी दिव्यांगांना ताब्यात घेतले. मात्र, ठाण्यात रीतसर नोंद केली नाही. दिवसभरापासून ठाण्यात उपाशीपोटी असलेल्या बांधवांसाठी एका सहकाऱ्याने सायंकाळी घरून जेवण आणले. मात्र, धंतोली पोलिसांनी दिव्यांगांचे जेवण पोलिस ठाण्याच्या बाहेर नेऊन फेकले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दिव्यांग बांधव उपाशीपोटी पोलिस ठाण्यात बसून होते. या प्रकाराची पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी दखल घ्यावी आणि दिव्यांगांना मानसिक त्रास देणाऱ्या धंतोलीच्या ठाणेदार सीमा मेहंदळेंवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष गिरीधर भजभुजे यांनी केली.

प्रमुख मागण्या
शेतमजूर व ग्रामीण श्रमिकांना किमान वेतन, पेन्शन आणि अन्य          सुविधा देणारा कायदा करा.
शेतमजूर व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करा.
मनरेगांतर्गत शेतीशी संबंधित कामाद्वारे २५० दिवसांचा रोजगार            तसेच ५०० रुपये प्रतिदिन मजुरी सुनिश्‍चित करा.
रेशन व्यवस्थेचे सार्वजनिकीकरण करा.

विदर्भ विकलांग संघर्ष समिती
नागपूर : विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या मोर्चाला पोलिसांनी यशवंत स्टेडियम परिसरातून निघतानाच अडविले. परवानगी न घेता मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याचा मोर्चेकऱ्यांवर आरोप करीत सर्वांना ताब्यात घेऊन धंतोली ठाण्यात नेले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विकलांग मोर्चेकऱ्यांनी सरकार अपंगाच्या मोर्चाला घाबरले. त्यामुळेच पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप केला. त्यामुळे विधानभवन परिसरात अपंगांच्या मोर्चाची दिवसभर चर्चा होती. दुसरीकडे मोर्चेकरी अपंगांनी धंतोली पोलिस ठाण्यात न्यायासाठी ठाण मांडले व पोलिस ठाण्यातून न हलण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com